नाशिकच्या दुर्गप्रेमींनी प्रजासत्ताकदिनी 'बाण'वर फडकविला तिरंगा

nashik climbers
nashik climbersesakal
Updated on

गणूर (नाशिक) : ७३व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यातील सुळक्यांच्या विश्वात प्रस्तरारोहणासाठी सर्वाधिक कठीण सुळका म्हणून ओळख असणारा ७१० फूटी "बाण" सुळका टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी प्रजासत्ताक दिनी सर करीत 'भारत माताकी जय', 'वंदे मातरम' या घोषणा देत तिरंगा फडकाविला. नाशिकच्या दुर्गप्रेमींनी ही अवघड मोहीम फत्ते करून दाखवल्याने नाशिककरांसाठी ही अभिमानाची गोष्ट म्हटली जात आहे.

शारिरीक आणि मानसिक कसोटी पाहणारा सुळका

या मोहीमेची सुरुवात साम्रद गाव, ता. अकोले जि. नगर येथून झाली. अडीच तासांची पायपीट बाण सुळक्याच्या पायथ्याला घेऊन जाते. २५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता शिवगर्जना देऊन प्रस्तरारोहणास सुरवात झाली. संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत ४२० फुट प्रस्तरारोहण करून तिसरे स्टेशन गाठले. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीताने तिरंग्यास मानवंदना देऊन प्रस्तरारोहणास सुरवात झाली. उरलेले २९० फुट प्रस्तरारोहण करून दुपारी ४ वाजता शिखर गाठून तिरंगा फडकाविला.

nashik climbers
आतापर्यंत राजपथावर अवतरलेले महाराष्ट्राचे चित्ररथ...पाहा PHOTOS

शारिरीक आणि मानसिक कसोटी पाहणारा ७१० फूटी अति कठीण श्रेणीतील प्रस्तरारोहण मार्ग, सुळक्याचे रांगडे रूप, छातीत धडकी भरावी असे सरळसोट कडे, कोणत्याही क्षणी कोसळणारे दगड, घोंघावणाऱ्या मध माश्यांची पोळे, पाण्याची प्रचंड कमतरता, कडाक्याची थंडी, अतिदुर्गम परिसर अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंखे, विशाल बोडके आणि सहाय्यक संघात असणाऱ्या महेश जाधव, अर्चना गडधे, अक्षय ठाकरे, समीर देवरे, रोहित पगारे, मंदार चौधरी, सागर बांडे, ओंकार रौंधळ, हेमंत पाटील आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.

बाण सुळका हा महाराष्ट्रामधील सर्वाधिक कठीण सुळका आहे. १९८६ साली पहिल्यांदा सर करण्यात आला आहे.

आतापर्यंत यांनी सर केला हा सुळका

नाव वर्ष. टीम चे नाव

1. मिलींद पाठक (जेष्ठ गिर्यारोहक) - १९८७. हॉलीडी हायकरस

२. विवेक मराठे व टीम - १९९१

३. सोहील ब्राह्मण व टीम - १९९९ व २००४

४. आम्ही गिर्यारोहक टीम - २०१५

५. गिरीवीराज टीम - २००४ व २०२१

६. पी.सी.एम.ए. व एस.सी.ए.एम टीम - २०२१

७. सेफ कलांमबींग इनोव्हेशेटीव व दुर्ग प्रेमी - २०२०

८. पॉईंट ब्रेक एडवेंचर नाशिक - २६ जानेवारी २०२२

nashik climbers
बाल गिर्यारोहक वरदराजे निंबाळकरचा गौरव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()