ताहाराबाद (जि. नाशिक) : तालुक्यातील ताहाराबाद परिसरात शासन मान्यता नसलेल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांची दिशाभूल होत असून, यासंदर्भात बागलाण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या नोटिसांना देखील शालेय प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. (Close unapproved school Delegation statement to Group Development Officer Nashik News)
सद्यस्थितीत अशा पद्धतीने अनधिकृत सुरु असलेल्या तालुक्यातील शाळांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांच्याकडे केली आहे. या वेळी गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी संबंधित शाळेशी संपर्क केला असता पिंपळनेर येथील खासगी संस्थेतर्फे ताहाराबाद येथे अनधिकृत शाळा सुरु असल्याचे उघडकीस आले.
पहिलीपासून पाचवीपर्यंत व सहावीपासून आठवीपर्यंत सुरु असलेल्या शाळांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून, तालुक्यात अशा प्रकारच्या शाळा सुरु असण्याची शक्यता आहे. याबाबत शिक्षण विभागाने शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. सोनवणे यांनी केली आहे. या वेळी भाऊसाहेब नांद्रे, विकिराज भामरे, अरुण नंदन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
"सदर शाळेवर मी स्वतः जाऊन पाहणी केली असून, नियमाप्रमाणे शाळेवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे." - चित्रा देवरे, गटशिक्षणाधिकारी, बागलाण
"आमच्या शाळेला पहिली ते पाचवीपर्यंत स्वयंअर्थ सह्याहित मान्यता आहे. पाचवीच्या पुढील विद्यार्थी दाखल नाहीत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या नोटिसांचा खुलासा आम्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवला आहे."
- संदिप साळवे, अध्यक्ष, मधुसूमन शिक्षण संस्था, ताहाराबाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.