School Opening : अन...शिक्षक नसल्याने बंद शाळा पुन्हा पूर्ववत झाल्या!

file photo
file photo esakal
Updated on

School Opening : कारसूळ (ता. निफाड) जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची पेसाअंतर्गत बदली झाली, त्याजागी नवीन शिक्षकांची नेमणूक होत नाही तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा शालेय व्यवस्थापन समितीने घेतला होता.

या अनुषंगाने या सेमी इंग्रजी डिजिटल प्राथमिक शाळेला शुक्रवारी (ता.१७) प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी भेट दिली. (closed schools due to lack of teachers School Opening at karsul nashik news)

यावेळी कारसूळ ग्रामस्थांची समजूत काढत, लवकरच एक शिक्षकांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन फुलारी यांनी यावेळी दिले. तसेच शाळा उघडत, यावेळी विद्यार्थ्यांना पोषण आहार, पाठ्यपुस्तक तसेच गणवेशाचे वाटप शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

कारसूळ जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांची पेसाअंतर्गत बदली झाली, त्यामुळे शाळेला शिक्षक नव्हते. रिक्त जागी नवीन शिक्षकांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा पवित्रा शालेय व्यवस्थापन समितीने घेत पहिल्या दिवशी शाळा बंद ठेवली.

आदिवासी भागातील शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्याच्या शासनाच्या चुकीच्या धोरणाला आमचा विरोध असून, समान शिक्षणासाठी समान शिक्षक धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने किमान कारसूळ शाळेच्या भवितव्यासाठी पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उघडू देणार नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी घेतली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

file photo
Weightless School Bag : पुस्तकाच्या 4 भागांमुळे दप्तर वेटलेस! ‘माझी नोंद’ पानांमुळे अभ्यास करणे सोपे

या संदर्भात शिक्षणाधिकारी फुलारी व निफाड गटविकास अधिकारी महेश पाटील यांना निवेदन देखील देण्यात आले होते. या शाळेत २३८ विद्यार्थी आहेत. शिक्षकांची ८ पदे मंजूर असून ७ पदांवर शिक्षक कार्यरत आहेत.

एक शिक्षक नसल्याने येथील शिक्षकांसह शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन केले होते. शिक्षण विभागाने आंदोलनाची त्वरित दखल घेत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी शाळेला भेट दिली.

यात, शिक्षक देण्यात येईल असे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी सामोपचाराची भूमिका घेतल्याने दुपारनंतर शाळा सुरु करण्यात आली.

file photo
NMC School Opening: पहिल्याच दिवशी सेवेत ‘स्मार्ट’ क्लासरूम! 68 शाळांमध्ये प्रकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.