सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्याला परतीच्या पावसाने सोमवारी (ता. १७) रात्री व मंगळवारी पुन्हा एकदा दणका दिला. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने उरल्यासुरल्या खरीप व भाजीपाला पिकांची वाट लागली आहे.
सिन्नर शहरात ढगफुटीमुळे अवघ्या अडीच तासांत १२० मिलिमीटर पाऊस पडला. शहरातून वाहणारी सरस्वती नदी पुन्हा धोक्याच्या पातळीत आल्याने शहरवासीयांच्या मनात धस्स झाले होते. देवनदी, म्हाळुंगी या प्रमुख नद्यांसह तालुक्याच्या विविध भागात नाले, ओहोळ देखील पातळी सोडून वाहत होते. (Cloudburst in Sinnar 120 mm of rain in just two half hours Nashik Rain Update Latest Marathi News)
सोमवारी रात्रीपासूनच सिन्नर तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. महसूल विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार सिन्नर शहरात अडीच तासात विक्रमी १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पांढुर्ली ८२ मिलिमीटर, डुबेरे ८० मिलिमीटर, देवपूर २६ मिलिमीटर, शहा १६ मिलिमीटर, वावी २६ मिलिमीटर, तर नांदूर-शिंगोटे मंडळात १५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. अर्थात ही आकडेवारी मंडळ स्तरावरील गावांमध्ये बसवलेल्या पर्जन्यमापक यंत्रांची असून, जागोजागी पडलेला पाऊस ढगफुटीसदृश असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात होऊन अवघ्या काही मिनिटांत परिसर जलमय बनल्याचे चित्र सर्वच भागात बघायला मिळाले. ठाणगावपासून डुबेरे, मनेगाव, पाटोळे, दापूर, गोंदे, कणकोरी, मानोरी, दातली, मुसळगाव, कुंदेवाडीपर्यंतच्या भागात पावसाचा जोर अधिक राहिला. सिन्नर शहरात देखील पावसाने धावपळ उडवली.
विशेषतः नदीकाठच्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली. पावसाचा जोर एवढा भयानक होता, की सरस्वती नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली होती. मात्र, गेल्या वेळेच्या महापुराने नदीपात्रातील अडथळे बहुतांशी दूर झाल्याने या वेळी फारसा धोका जाणवला नाही.
सिन्नर शहरातून वाहणाऱ्या सरस्वती, शिवनदीसह पश्चिम पट्ट्यातील पावसाने माळुंगी नदी, तसेच देवनदीला महापूर आल्याची परिस्थिती होती. दापूर, गोंदे भागात झालेल्या ढगफुटीमुळे पुन्हा एकदा शेतीशिवार पाण्याखाली गेला होता. दातली गावाला तर मंगळवारी दुपारी दोनपर्यंत पाण्याचा वेढा पडलेला होता. वावी-ओझर रस्त्यावरील वडांगळी येथील पूलदेखील रहदारीसाठी बंद करण्यात आला होता.
तालुक्याच्या पूर्व भागातदेखील सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने अगोदरच पाण्यात गेलेल्या पिकांमध्ये अधिकचे पाणी साठले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात काहीशी उघडीप मिळाल्यानंतर वेगात सुरू असलेल्या पिके काढणीच्या कामाला पुन्हा ब्रेक देण्याची वेळ बळीराजावर ओढवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.