Rain Update : पालखेड परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; वाहनधारकांची ताराबंळ

An underwater kumbhari road.
An underwater kumbhari road.esakal
Updated on

निफाड (जि. नाशिक) : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला पाऊस थांबायचे नाव घेत नसून शुक्रवारी (ता. ३०) संपूर्ण तालुक्यात दुपारी चारच्या सुमारास धो धो पाऊस झाला. तर पालखेड परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे मनकर्णिका नदीला पूर आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. नांदुर्डी, पंचकेश्वर, पालखेड, कुंभारी यास अन्य भागांतील रस्त्यांवर पाणी आल्याने काहीकाळ वाहतूक थांबली होती. (Cloudburst rain in Palkhed area Nashik Latest Marathi News)

An underwater kumbhari road.
Nashik Crime News : वाके येथे गावठी दारु, रसायन जप्त; 2 महिला ताब्यात

निफाड तालुक्यातील नैताळे, विंचूर, धारणगाव, देवगाव, कांदळद, निफाड, लासलगाव, पालखेडसह परिसरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक तास पाऊस झाला. त्याचा परिणाम मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांसह द्राक्ष बाग छाटणीवर होणार आहे.

द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने छाटण्यांची कामेही सुरू झाली असून, छाटणी केलेल्या काही द्राक्ष उत्पादकांच्या द्राक्ष बागेला नवीन फुटवा येत असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे टोमॅटो, मका, सोयाबीन यासारख्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणत पाणी साचले आहे.

रदार पावसामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनावर काळजीचे सावट निर्माण झाले आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने पालखेड परिसरातील काही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, शुक्रवारचा बाजार असल्याने पावसामुळे निफाड शहरात व्यावसायिकांचे मोठे हाल झाले.

An underwater kumbhari road.
Rain Crop Damage News : मक्याचे उत्पादन घटणार; अतिपावसामुळे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.