नाशिक : स्वामीनारायण मंदिराच्या भूमिपूजनासाठी तीन वर्षांपूर्वी आलो त्यावेळेस मी मंत्री होतो. आता मुख्यमंत्री असताना माझ्या हातूनच मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे हे माझे भाग्य असून स्वामी नारायणांच्या आशीर्वादाने राज्यात सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली. मंदिराची साकारलेली कलाकृती अद्भुत व आकर्षित असल्याने भविष्यात तीर्थ व पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (CM Eknath Shinde statement about Swaminarayan Temple Nashik Latest Marathi News)
अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या वतीने गोदावरी काठी तपोवनच्या केवडी वनात स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले. त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीला मंत्र नगरी म्हणून देखील संबोधले जाते या नगरीत आता स्वामीनारायण मंदिराच्या रूपाने आणखीन एक भव्य दिव्य कलाकृती साकारली आहे.
मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. मंदिराचे भूमिपूजन सन 2017 मध्ये माझ्याच हस्ते झाले. त्यानंतर तीन वर्षांनी मंदिर पूर्णत्वास आले तीन वर्षात मंदिर निर्माण होणे ही असंभवित बाब स्वामी नारायण समाज संस्थेने शक्य करून दाखवली. मुख्यमंत्री म्हणून मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मला हजेरी लावता आली हा स्वामीनारायणचाच आशीर्वाद आहे.
स्वामी नारायण मंदिर नाशिक शहराची शोभा वाढविली पवित्र तीर्थस्थळ म्हणून उदयास येईल, तीर्थयात्रे करून साठी मंदिर आकर्षणाचे केंद्र बनेल नाशिक साठी धार्मिक दृष्ट्या फार मोठी उपलब्धी आहे. उत्तम कलेचा नमुना म्हणून मंदिराकडे बघता येईल.
मंदिर निर्माण करणाऱ्या स्वामीनारायण संस्था त्यागाच्या भावनेने जगभर सेवा करत आहे समाजाला जोडण्याचे काम करणाऱ्या या संस्थेच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार ऍड राहुल ढिकले, सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., आधी उपस्थित होते.
राज्यात आपलं सर्वांचं सरकार
अडीच महिन्यापूर्वी राज्यात नवीन सरकार आले आहे या सरकारने सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा विचार मांडला आहे व ते प्रत्यक्षात आणले जात आहे. राज्याच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद असून तुम्ही लोकांची सेवा करा केंद्र सरकार तुम्हाला मदत करेल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनातील सरकार स्थापन झाले असून प्रत्येकाचे भले करणे हाच आपला अजेंडा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश
अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख परमपूज्य महंत स्वामी महाराज यांनी मंदिराच्या निर्मनाचे कौतुक करताना उपस्थित त्यांना प्रेमाचा व शांततेचा संदेश दिला. मंदिराचे पावित्र्य जपण्याचे आवाहन त्यांनी केले. सद्गुरु परम पूज्य विवेक सागरची स्वामी यांनी स्वामीनारायण मंदिर नाशिक शहराचे वैभव असल्याचा गौरव केला मंदिराची निर्मिती विश्वशांतीसाठी केल्याचे सांगताना अंधश्रद्धा दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.