CM Eknath Shinde : महापालिकेचे माजी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने विविध संवर्गांत दिलेल्या चुकीच्या पदोन्नतीची चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊन महिना होत असताना अद्यापही महापालिका प्रशासनाला चौकशीच्या आदेशाचे पत्रच पोचले नाही.
त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकारच्या कामकाजाच्या वेगावर संशय व्यक्त होत आहे. (CM orders To investigate wrongful promotion have not reached municipal administration nashik news)
महापालिकेचे माजी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी पदोन्नतीचे धोरण राबविताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
पदोन्नतीचे नियम धाब्यावर बसविल्याने याविरोधात महापालिका म्युनिसिपल कर्मचारी व कामगार सेनेचे तत्कालीन अध्यक्ष व शिवसेनेच्या शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यात पदोन्नतीबद्दल नियम ठरविण्याचे अधिकार किंवा अटी-शर्ती ठरविण्याचे अधिकार कर्मचारी किंवा समितीला नसतानाही बेकायदेशीर नियमावलीच्या आधारे पदोन्नती देण्यात आली.
पदोन्नती समितीची नियमावली कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. नियमावलीमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा, शर्तीवर विपरीत परिणाम होणार आहे. घोडे-पाटील यांनी स्वार्थी विचाराने अटी-शर्ती बनविल्या. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. परंतु, अद्याप मंत्रालयातून चौकशीचे पत्रच प्राप्त झाले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.