Winter Season : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका; निफाड अन् जळगावमध्ये 5 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला!

Shekoti
Shekotiesakal
Updated on

नाशिक/निफाड : उत्तर महाराष्ट्रवासीय थंडीने कुडकुडले. सोमवारी (ता. ९) राज्यातील नीचांकी पाच अंश सेल्सिअस किमान तापमान जळगाव आणि कुंदेवाडी (ता. निफाड) येथील गहू संशोधन केंद्रात नोंदविले गेले. थंडीमुळे गहू, हरभरा पिकांना फायदा होणार असला, तरीही द्राक्षउत्पादकांना धडकी भरवणारा आहे.

येत्या ४८ तासांत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतील काही भागामध्ये थंडीची लाट ते तीव्र शीतलहर पसरण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Cold in North Maharashtra Mercury dropped to 5 degrees Celsius in Niphad and Jalgaon Winter Season nashik news)

नाशिकमध्ये सोमवारी किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. पुण्यात ८.६, तर औरंगाबादमध्ये ५.७, नंदुरबारमध्ये १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकचा पारा २४ तासांमध्ये ४.३ अंश सेल्सिअसने घसरला. रविवारी (ता. ८) किमान १३ आणि कमाल २६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाशिकमध्ये नोंद झाली होती.

गेल्या आठवडाभरामध्ये किमान तापमानाने चढ-उतार राहिला. १ जानेवारीला १०, २ जानेवारीला १०.२, ३ जानेवारीला १०.६, ४ जानेवारीला १३.२, ५ जानेवारीला १३.२, ६ जानेवारीला १६.२, ७ जानेवारीला १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले होते.

निफाडमध्ये सकाळपासूनच वातावरणात गारठा असल्याने सायंकाळच्या थंडीने बोचरे रूप धारण केले. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने थैमान घातले होते. निफाड तालुक्यासह लासलगाव व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मका, सोयाबीन, कांद्यासह भाजीपाला पाण्यात वाहून गेले. दिवाळीनंतर पाऊस सुरू होता.

Shekoti
CM Eknath Shinde Group : रिपाइं संघर्ष आघाडी मुख्यमंत्री शिंदे गटासोबत; रिपाइंत फूट!

त्यामुळे आगामी काळात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीने लासलगाव शहर गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक ऊब मिळवत होते.

गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे तापमान खाली येत गेले आणि थंडीत वाढ झाली. रविवारी (ता. ८) रात्रीपासून गारठ्यात अधिक वाढ झाल्याने गारवा अधिक जाणवू लागला आहे.

गहू, हरभरा पिकांची वाढ जोमाने होण्यासाठी थंडीची मदत होणार आहे. थंडी कायम राहिल्यास या पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र पारा आणखी घसरल्यास रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी अभ्यासक सांगतात.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Shekoti
Nashik News : महाविद्यालयातच मिळणार जातपडताळणी प्रमाणपत्र; महाराष्ट्रात मंडणगड पॅटर्न!

उबदार कपड्यांना मागणी

थंडीचा जोर वाढू लागल्याने उबदार कपड्यांच्या मागणीत वाढली. दिवसभर थंडी असल्याने उबदार कपडे घालण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. वाढलेल्या थंडीमुळे लासलगावमधील विक्रेत्यांकडे उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होती. कानटोपी, स्वेटर, जॅकेट, हातमोजेची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

"निफाड तालुक्यात द्राक्षबागांचा हंगाम तोंडावर आला आहे. सध्याचे हवामान द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढवणारे आहे. हवामानात भुरीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. वाढलेली थंडी पोषक मानली जात असली, तरी द्राक्ष उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे" - बाबूराव सानप (द्राक्षउत्पादक, सोनेवाडी)

Shekoti
Nashik News : सिन्नर ‘जिंदाल’च्या मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू; औद्योगिक सुरक्षाचे तीनतेरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()