Nashik News : मनमाड परिसरात शेकोट्या पेटल्या; थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाय

temperature decrease in manmad
temperature decrease in manmadesakal
Updated on

मनमाड : गेल्या तीन- चार दिवसांपासून परिसरात थंडीचा वाढलेला कडाका वाढला आहे. थंडीपासून बचाव होण्यासाठी रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर रात्री नऊनंतर रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पहाटे थंडीचा चांगलाच कडाका जाणवू लागल्याने कामावर जाणारे चाकरमाने आणि शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना थंडीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी- जास्त होत आहे. आता मात्र तापमानाचा पारा घसरायला सुरवात झाली आहे. (Cold increases in manmad people burn fireplace and take care from winter Nashik News)

temperature decrease in manmad
Nashik News : समाजकंटकका कडून भाताच्या उडव्याला आग

२२ अंशावर असलेले तापमान पहाटेच्या सुमारास १४ अंशापर्यंत घसरत आहे. रविवारी १३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. तापमान आणखी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे आगामी काही दिवसात मनमाडकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, अचानक थंडी वाढल्याने जनजीवनावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. नागरिक उबदार कपडे घालूनच दिवसाची सुरवात करीत असून, थंडीच्या कडाक्यात व्यायामाला प्राधान्य दिले जात आहे. थंडीबरोबर सकाळच्या सुमारास धुक्याचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे.

temperature decrease in manmad
Nashik News : 30 शेळ्यांचा एकाचवेळी मृत्यू; पशुपालक हळहळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()