Nashik Unseasonal Rain Damage: शासनाकडून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदतीसाठी प्रयत्न : जिल्हाधिकारी जलज शर्मा

चांदवड तालुक्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
Jalaj Sharma
Jalaj Sharmaesakal
Updated on

चांदवड : शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगत चांदवड येथील शेतकऱ्यांना दिलासा दिला.

तालुक्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासमोर शासनाकडून मदतीचा हात तत्काळ मिळत नाही.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाही, अशी खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. (Collector Jalaj Sharma statement on Nashik Unseasonal Rain Damage Government efforts to provide immediate relief to affected nashik)

तालुक्यात रविवारी झालेल्या अवकाळी व गारपिटीने द्राक्ष, कांदा, डाळिंब, पपई, सीताफळ आदी पिकांचे सात हजार ५७७ हेक्टर क्षेत्रफळावरील जवळपास १९ हजार ४७० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतानाच थोड्याफार प्रमाणात कांदा, द्राक्ष, टोमॅटो पिकांची लागवड झालेली असून, ही पिके काढणीस आली आहेत. यातच रविवारी अवकाळीने जोरदार तडाखा दिल्याने जवळपास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

या नुकसानीची पाहणी आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, तहसीलदार मंदार कुलकर्णी, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, विलास भवर, गणेश निंबाळकर, डॉ. नितीन गांगुर्डे, मनोज शिंदे यांनी केली.

यावेळी शेतकऱ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. मदतीचा हात तत्काळ मिळत नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे का उभे राहत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Jalaj Sharma
Nashik Unseasonal Rain: कृषी आयुक्तांसमोर शेतकऱ्यांना अश्रू अनावर; गेडाम यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

वाकी (खुर्द) येथील शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांचे संपूर्ण घर वादळात पत्रांसह पूर्णतः उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. या घटनेत पत्नी सुनीता व मुलगा दर्शन गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत.

जखमी दर्शनचा या दुर्घटनेत पाय तुटला आहे. दर्शन भारतीय सैन्यात भरती होणार आहे. मात्र, त्याचा पाय तुटल्याने भरतीप्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासकीय स्तरावर मदत करण्याची विनंती नागरिकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली.

"गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोचवल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान मोठे असल्याने त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शक्य तितकी मदत शेतकऱ्यांना नक्कीच केली जाईल."- डॉ. राहुल आहेर, आमदार

Jalaj Sharma
Unseasonal Rain: शेकडो क्विंटल कांद्याचे अवकाळीने नुकसान ; समितीच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना फटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.