Police Combing Operation : शहरातील वाढती टवाळखोरी, गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवित टवाळखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत पोलिसांनी २१० टवाळखोरांविरोधात कारवाई केली. (combing operation was launched in city to take action against crime nashik crime news)
पोलिस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारीला बीमोड करण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला असून, एकापाठोपाठ एक सराईत गुन्हेगारांवर तडीपारीसह स्थानबद्धतेची कारवाई सुरू केली आहे. त्यातच, टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने रात्रीच्या वेळी मोकळी मैदाने, चौकांत टवाळ्या करणाऱ्यावर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर- परिसरात ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविल्या जात आहेत. यादरम्यान, आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन पोलिसांनी चेकिंग करून गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे.
शहराच्या उपनगरी परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. विशेषत: सिडको, सातपूर, उपनगर, नाशिकरोड, पंचवटी या परिसरात चौकांमध्ये, मोकळ्या भूखंडांवर रात्रीच्या वेळी टवाळखोरांकडून धुडगूस घातला जातो. परिसरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. या टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होते आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रात्रीची गस्तीपथकांकडूनही मध्यरात्रीच्या वेळी टवाळक्या करणाऱ्यांवर कारवाई झाल्यास टवाळखोरी मोडीत निघण्यास मदत होणार आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये टवाळखोरांविरोधात कारवाईची मोहीम राबविण्यात आली.
पोलिस ठाणेनिहाय मोकळी मैदाने, चौक, टपऱ्या, आडोशाच्या जागा याठिकाणी टवाळ्या करणाऱ्याविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यात पोलिसांनी शहरात २१० टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कलमान्वये कारवाई केली आहे. यावेळी शहराच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली.
ठाणेनिहाय कारवाई
पंचवटी - १, आडगाव - २३, म्हसरुळ - १७, सरकारवाडा -००, भद्रकाली - ३०, मुंबई नाका - १५, गंगापूर - १३, अंबड - ६, सातपूर - २७, इंदिरानगर - २५, नाशिकरोड - १५, उपनगर - ९, देवळाली कॅम्प - १०, चुंचाळे पोलिस चौक - २० : एकूण - २१०
आडगाव, म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलिस ठाणे हद्दीत पोलिस ठाणे प्रभारी व गुन्हे शाखेकडील अधिकारी यांच्यासह फुलेनगर पंचवटी नाशिक, निलगिरी बाग, नांदूर नाका, अश्वमेध नगर, शांतिनगर, मखमालाबाद गांव, गंजमाळ,
पंचशीलनगर, भारतनगर, मल्हारखान, कस्तुरबा नगर, संतकबीर नगर, शिवाजीनगर तसेच लेखानगर घरकुल, चुंचाळे, कामटवाडा, प्रबुद्धनगर, सातपूर गांव, अशोकनगर, वडाळागांव, राजीवनगर, पांडवनगर, सुभाष रोड, अश्विनी कॉलनी, सुंदरनगर, गांधीनगर, नारायण बापूनगर, भगूर व देवळाली कॅम्प या परिसरात टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.