नाशिक : आजघडीला प्रत्येक कुटुंबीयांच्या निकडीच्या वस्तूंमध्ये गॅस सिलिंडरचाही (LPG Gas Cylinder) समावेश आहे. त्यामुळे सिलिंडर तातडीने उपलब्ध होण्यासाठी वितरकाकडे नोंदणी आणि त्यानंतर ते घरपोच करणारा डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) महत्त्वाचा.
दिवसभर १४ ते १८ किलो वजनाचे गॅस सिलिंडर घरपोच करणारा डिलिव्हरी बॉयचे अर्थार्जनही यावरच असते. त्यासाठी काही वितरकांकडून कमिशन, तर काहींकडून वेतन अदा केले जाते. मात्र, ग्राहकांच्या तक्रारी आल्या तर या डिलिव्हरी बॉयला वितरकाकडून कामावरून काढूनही टाकले जाते. (Commission is earned by delivery boy for delivering cylinders LPG Cylinder Nashik latest marathi news)
नाशिक शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे किमान १५ वितरक आहेत. या प्रत्येक वितरकांकडे शेकडो ग्राहकांच्या नोंदी आहेत. या सर्व ग्राहकांना घरपोच सिलिंडर पोच करणे वितरकाला बंधनकारक आहे. त्यासाठी वितरक डिलिव्हरी बॉय नेमतात.
वितरकांचे सिलिंडर पोच करण्यासाठी वाहन असेल तर त्या डिलिव्हरी बॉयला ठराविक वेतन दिले जाते. डिलिव्हरी बॉयकडे वाहन असेल तर त्यास प्रतिसिलिंडरप्रमाणे कमिशन दिले जाते. याव्यतिरिक्त डिलिव्हरी बॉयला ग्राहकाकडून सिलिंडर पोच केले म्हणून १० ते २० रुपये स्वखुशीने दिले जातात, असे सांगितले जाते.
मात्र ही रक्कम बळजबरीने घेतले जात असेल तर त्याप्रकरणी ग्राहकांनी वितरकाकडे तक्रार करणे गरजेचे असते. दरम्यान, दुसरी बाजू पाहता वेतन वा कमिशनमधून डिलिव्हरी बॉयला वाहन देखभाल व इंधनाचाही खर्च करावा लागतो. त्यासाठी वेगळा खर्च वितरक वा गॅस सिलिंडर कंपनीकडून दिला जात नाही.
ऑनलाइन कॅशमेमो
गेल्या काही वर्षांपासून सिलिंडरची नोंदणी ही ऑनलाइन केली जाते. सिलिंडर नोंदणी केल्यानंतर काही तासांतच ग्राहकाच्या संपर्क क्रमांकावर सिलिंडरचा कॅशमेमो येतो. त्यानुसार ग्राहकाने रक्कम अदा करावयाची असते.
याशिवाय सिलिंडरची रक्कम ऑनलाइन अदा करण्याच्याही सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार होणार नाही, अशी सुविधा उपलब्ध आहे.
शहरात १५ वितरक; १०० डिलिव्हरी बॉय
नाशिक शहर हद्दीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे १५ वितरक आहेत. या प्रत्येक वितरकांकडे शेकडो ग्राहकांच्या नोंदी आहेत. या ग्राहकांना सिलिंडर घरपोच करण्यासाठी किमान १५ डिलिव्हरी बॉय असून, शहरभरात सुमारे १०० डिलिव्हरी बॉय आहेत.
वितरकांकडून प्रत्येक गॅस सिलिंडर पोच करणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडे सिलिंडरचे वजन करण्यासाठी वजनकाटा दिला जातो. याशिवाय लिकेज सिलिंडरसाठी वायसर (रबरी) दिले जाते. जेणेकरून सिलिंडर देताना ते चेक करून देतो. अशावेळी लिकेज असेल, तर तेथेच ते बदलून दिले जाते.
"वितरकाचे वाहन असेल तर वेतन आणि डिलिव्हरी बॉयचे वाहन असेल तर कमिशन, अशी वेतनाची पद्धत असते. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी, कोणाचीही तक्रार येणार नाही याला प्राधान्य दिले जाते. सिलिंडर नोंद केल्यानंतर त्याचा कॅशमेमो ग्राहकाला आधीच मिळतो. त्याव्यतिरिक्त पैसे ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला देऊ नये."
-लक्ष्मण मंडाले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा गॅस डीलर्स असोसिएशन तथा संचालक, भगवती गॅस एजन्सी
"वितरकाकडे काही प्रमाणात वेतनावर, तर काही कमिशनवर डिलिव्हरी बॉय असतात. ग्राहकांना सेफ्टी सेवा पुरविण्यास प्राधान्य असते. सिलिंडर आल्यानंतर ते चेक करून घेणे, वजन करून घेणे. काही शंका असेल, तर तत्काळ वितरकाशी संपर्क साधावा. कॅशमेमोप्रमाणेच पैसे देणे वा ऑनलाइन सोयीसुविधा उपलब्ध असल्याने पारदर्शकता आली आहे. एखाद्या डिलिव्हरी बॉयबाबत ग्राहकांच्या तक्रारी आल्या तर त्याला कामावरून कमी केले जाते."
-राघवेंद्र जोशी, सेक्रेटरी, नाशिक जिल्हा गॅस डीलर्स असोसिएशन तथा संचालक, एन. जोशी गॅस सर्व्हिसेस
"ग्राहकांना उत्तम सुविधा देणे याला प्राधान्य देताना डिलिव्हरी बॉयबाबत तक्रारी आल्या, तर कारवाई केली जाते. काळा बाजार होणार नाही, यासाठी ग्राहकांनीही सिलिंडर आल्यानंतर चेक करून घ्यावे. शंका असल्यास वितरकाशी संपर्क साधावा. नॉर्मली कॅशमेमोप्रमाणेच ग्राहकांनी पैसे द्यावेत." -रमेश पाडेकर, संचालक, पाडेकर गॅस एजन्सीज्
"स्वतःचे वाहन असल्याने गॅस एजन्सीकडे कमिशनवर काम करतो. दिवसाला पुरवठा होणाऱ्या सिलिंडरप्रमाणे कमिशन मिळते. ते कधी कमी तर कधी जास्तही असते. काही ग्राहक स्वखुशीने १० ते २० रुपये देतात. मात्र नाही दिले म्हणून त्यांना सेवा न देणे, असे होत नाही. ग्राहकांना उत्तम सेवा देणे यालाच प्राधान्य असते." -भारत सोळंके, डिलिव्हरी बॉय
"उंच इमारतींना लिफ्ट असते तर लहान इमारतींना नसते. गॅस सिलिंडर खांद्यावर घेऊन तीन-चार मजले चढावे लागतात ते ग्राहकांच्या सेवेसाठीच. त्यामुळे त्यांनी कॅशमेमोव्यतिरिक्त पैसे दिले पाहिजे असे होत नाही. स्वखुशीने दिले तरच घेतो, बळजबरी केली जात नाही. तक्रार केली तर आमच्या रोजीरोटीवर गदा येऊ शकते. आमचेही कुटुंब यावरच चालते ना. वितरकाकडूनही सिलिंडर पोच केल्याचे कमिशन मिळतच असते." -सुनील धाबे, डिलिव्हरी बॉय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.