Nashik Lok Sabha Election : निवडणुकीत पैसे, मद्य वाटपावर आयोगाची नजर

निवडणूक काळात कुठेही मद्य, रोकड, शस्त्रसाठा आढळल्यास त्याची माहिती त्याचक्षणी निवडणूक आयोगाला मिळणार आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : निवडणूक काळात कुठेही मद्य, रोकड, शस्त्रसाठा आढळल्यास त्याची माहिती त्याचक्षणी निवडणूक आयोगाला मिळणार आहे. त्यासाठी पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणांसाठी निवडणूक आयोगाने खास ‘इलेक्ट्रोलर सिझर मॅनेजमेंट सिस्टीम’ हे नवीन ॲप विकसित केले आहे.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता येत्या काही महिन्यांत जाहीर होणार आहे. (Commission watch on distribution of money and liquor in lok sabha elections nashik news)

त्यादृष्टीने निवडणूक आयोग तयारीला लागले असून, मतदारांची सुधारित यादी मंगळवारी (ता.२३) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीत मतदारांना पैसे व मद्याचे प्रलोभन दाखवले जाते. या काळात रंगणाऱ्या ओल्या पार्ट्या नेहमी चर्चेचा विषय ठरतो. आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र काही उमेदवारांकडून त्यापेक्षा अधिक खर्च केला जातो.

या काळात कुठलेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून शासकीय यंत्रणा, पथके बारकाईने लक्ष ठेऊन कारवाई करतात. आता रोकड, अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ वा शस्त्र अशी कुठलीही जप्तीची कारवाई केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित नव्या ॲपमध्ये समाविष्ट करावी लागणार आहे.

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक तयारीसाठी फेब्रुवारी महत्त्वाचा : उपायुक्त रमेश काळे

त्यामुळे या कारवाईची माहिती लगेच निवडणूक आयोगाला मिळणार आहे. अशा प्रकारच्या कारवाया प्रामुख्याने पोलिस, उत्पादन शुल्क विभाग व प्राप्तीकर विभागाकडून होतात. संबंधितांना कारवाईनंतर त्याची माहिती ॲपमध्ये समाविष्ट करावी लागणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी सांगितले.

यंत्रणेला सतर्क राहण्याचे आव्हान

निवडणूक काळात एखादा अनुचित प्रकार उघडकीस आल्यास त्याविषयी थेट निवडणूक आयोगाकडून विचारणा होऊ शकते. विशेषत: रोकड, मद्यसाठा याविषयीच्या तक्रारींची माहिती तत्काळ निवडणूक आयोगाला या ॲपद्वारे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलिसांसह शासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आव्हान असणार आहे.

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Elections : अंदाजपत्रकाची उडी अडीच हजार कोटी पार; आचारसंहिता पूर्वीच मंजुरीसाठी धावपळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()