Tribal Ashram Schools : राज्यातील आश्रमशाळांची होणार तपासणी : आयुक्त नयना गुंडे

आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी गंभीर दखल घेत संबंधित शिक्षकासह स्त्री अधीक्षिका यांना निलंबित केले असून प्राचार्यांना देखील नोटीस बजाविली आहे.
Commissioner Nayana Gunde
Commissioner Nayana Gundeesakal
Updated on

Tribal Ashram Schools : आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य आश्रमशाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर प्रकारांची आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी गंभीर दखल घेत संबंधित शिक्षकासह स्त्री अधीक्षिका यांना निलंबित केले असून प्राचार्यांना देखील नोटीस बजाविली आहे.

आश्रमशाळा आणि वसतीगृहामध्ये घडणाऱ्या अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी आश्रमशाळा, वसतिगृहांना भेटी देऊन त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी सांगितले. (Commissioner Nayana Gunde statement of Ashram schools in state will be inspected nashik news )

आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत असलेल्या एका आश्रमशाळेत १५ दिवसांपूर्वीच अल्पवयीन विद्यार्थिनी प्रसूती झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी दोषींवर कारवाईचा अहवाल शासनाला सादर करत त्यांच्यावर कारवाई केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच एका एकलव्य निवासी शाळेतील इयत्ता सातवीतील १५ ते २० विद्यार्थिनींशी तेथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची बाब उघड झाली आहे.

दर प्रकरण गंभीर असल्याने आयुक्त गुंडे यांनी शिक्षकांना निलंबित केले आहे. सदर शिक्षकांकडून यापूर्वी देखील असे प्रकार घडले असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहे. याप्रकरणी संबंधित दोन शिक्षकांना निलंबित करण्याची कारवाई केली असून आश्रमशाळेच्या प्राचार्यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

Commissioner Nayana Gunde
Ashram School Teacher : राज्यात 96 टक्के शिक्षकांची परीक्षेकडे पाठ; आदिवासी शिक्षकांचा चाचणी परीक्षेवर बहिष्कार

खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल. त्या आश्रमशाळेतील स्त्री अधिक्षकेस देखील काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आश्रमशाळा व वसतीगृहावर असे प्रकार होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जातात. मात्र, यात काही उणिवा राहत असतील तर, त्याची दखल घेतली जाईल.

याकरिता आता सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांना मी स्वतः भेटी देणार आहे. येथील मुला-मुलींशी संवाद साधणार आहे. आयुक्तालयातील विविध अधिकाऱ्यांना देखील भेटी देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागविला असल्याचे आयुक्त गुंडे यांनी सांगितले.

Commissioner Nayana Gunde
Tribal Ashram School: आदिवासी आश्रमशाळांची होणार तपासणी; राज्य शासनाचे जिल्हाधिकारी, जि.प. सीईओंना निर्देश

अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाडाझडती

आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी गुरुवारी (ता.१८) अचानक आयुक्तालयासह, अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालयाला भेट देत अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. गुंडे यांनी प्रत्येक दालनात जाऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलावर असलेल्या फाइलसह दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला.

गुंडे यांच्या अचानक भेटीमुळे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी त्यांच्या टेबलवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी मोठया तक्रारी होत्या. तसेच फाइल वेळात निघत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या.

या पार्श्वभूमीवर आयुक्त गुंडे यांनी प्रत्येक कक्षाची पाहणी करत फाइल कधी आली ? फाइलचे कोणत्या पातळीवर आहे? याबाबतची विचारणा केली. अनुपस्थित कर्मचाऱ्यांची माहितीही आयुक्तांनी मागविली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.

Commissioner Nayana Gunde
Tribal Ashram School: नवीन वेळापत्रकानुसारच आश्रमशाळा सुरू राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.