सुरेश वाडकर म्हणतात, 11 वर्षांपासून मी वनवास भोगतोय..

suresh wadkar
suresh wadkaresakal
Updated on

नाशिक : गेल्या अकरा वर्षांपासून मी हा वनवास भोगत आहे. या वादातून सुटका व्हावी, म्हणून अनेकांना सांगितले. मात्र, आश्‍वासनाशिवाय काहीच हाती आले नाही. आता पोलिस आयुक्त दीपक पांडे (nashik police commissioner deepak pandey) मला या प्रकरणातून न्याय मिळवून देतील, असा विश्‍वास ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (suresh wadkar) यांनी मंगळवारी (ता. ३) व्यक्त केला. पोलिस आयुक्तालयात भूमाफिया लघुपटाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. पद्मा वाडकर प्रमुख पाहुण्या होत्या. (Commissioner-of- Police-will-give-me-justice-suresh-wadkar-said-jpd93)

आता पोलिस आयुक्तच मला या प्रकरणातून न्याय मिळवून देतील,

वाडकर म्हणाले, की मित्रावर विश्‍वास ठेवून मी नाशिकला जमीन खरेदी केली. मात्र, यात फसवणूक होऊन मला न्यायालयीन लढाई लढावी लागली. गुन्हाही दाखल झाला. त्या वेळी तत्कालीन अधिकारी, राजकीय व्यक्तींकडे मी पाठपुरावा केला. मात्र, आश्‍वासनाशिवाय माझ्या पदरी काहीच मिळाले नाही. जमिनीच्या वादामुळे डोक्यावर मोठा बोजा पडला. एक वर्षापूर्वी पोलिस आयुक्त पांडे यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मला मोठा दिलासा दिला. या प्रकरणात त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. माझा अकरा वर्षांचा वनवास ते थांबवतील, अशी अशा आहे.

न्याय मिळवून देऊ - आय़ुक्त पांडे

पोलिस आयुक्त पांडे म्हणाले, की शहरातील संघटित गुन्हेगारी पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी आपण मोहीम सुरू केली असून, तक्रारदारांनी केवळ आमच्याकडे तक्रार करायची. नाशिक पोलिस नक्कीच त्यांना न्याय मिळवून देतील. वाडकर यांना आम्ही कायद्याच्या चौकटीत जे शक्य असेल, त्याचा वापर करून न्याय मिळवून देऊ.

संगीत अकादमीचे स्वप्न अपुरे

नाशिक जिल्ह्यातील तरुण- तरुणी संगीताचे धडे घेण्यासाठी माझ्याकडे मुंबईत येतात. येथील मुलांमधील संगीतातील असलेले कौशल्य पाहून मी याठिकाणी संगीत अकादमी उघडण्याचे स्वप्न पाहत नाशिक रोडला मित्राच्या मध्यस्थीने जागा घेतली. मात्र, त्याने मला फसविले. यामुळे अनेक आर्थिक समस्या उद्भवल्या. मी मध्यंतरी देश सोडण्याचाही विचार केला. त्यामुळे येथील अकादमीचे स्वप्न अपुरे राहिले. सर्व त्रासातून मुक्त झाल्यानंतर भविष्यात याचा विचार मी नक्कीच करेल, असेही वाडकर म्हणाले.

suresh wadkar
विवाहितेचे टोकाचे पाऊल; २ वर्षाच्या लेकीलाही संपविले

लघुचित्रपटाचे कार्यकारी निर्मात योगेश कमोद म्हणाले, की गंगापूर रोड येथे जमिनीच्या वादातून झालेल्या घटनेवर हा संपूर्ण लघुपट तयार केला आहे. या गुन्ह्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावत सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई केली. या सत्य घटनेवर हा लघुपट आहे. यात कलाकरांसह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भूमिका साकारली आहे. मान्यवरांच्या हस्ते लघुपटांतील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, संकलन आदींसह काम करणाऱ्या सर्वांचा सत्कार झाला.पोलिस आयुक्त दीपक पांडे, लघुपटाचे दिग्दर्शक समीर रहाणे, कार्यकारी निर्माता योगेश कमोद, पोलिस उपायुक्त विजय खरात, अमोल तांबे, दिलीप बारकुंड, पौर्णिमा श्रींगी आदी उपस्थित होते.

suresh wadkar
मोलमजुरी करत आकांक्षाची गरुड भरारी! जिद्दीच्या बळावर प्रथम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.