नाशिक : पोलीस आयुक्तांनी नाशिककरांसाठी सुरू केलेल्या व्हॉटसॲपवर शहरातील कॉलेज कॅम्पसमध्ये उपद्रवी टवाळखोरांवर कारवाईसाठी केलेल्या सूचनेची लगेचच अंमलबजावणी करण्यात आल्याने महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तर, शहर गुन्हेशाखेच्या गुंडा पथकाने शहरातील कॉलेज कॅम्पसमध्ये टवाळक्या करणाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने विनाकारण कॉलेज कॅम्पसमध्ये जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Commissioners goon squad bang Crackdown on truants on college campuses Serious attention to notification on Whatsapp Nashik Police)
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्हेगारी व टवाळखोरीला आळा घालण्यासाठी खुबीने सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.
एक्स व्टिटर हॅण्डल पाठोपाठ नाशिककरांसाठी व्हॉटसॲप क्रमांक सूचना व अभिप्राय देण्यासाठी सुरू केला. आयुक्तांच्या ९९२३३२३३११ या व्हॉटसॲप क्रमांकावर शहरातील एका महाविद्यालयाकडून टवाळखोरांच्या उपद्रव व त्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती.
या सूचनेची आयुक्त कर्णिक यांनी गांभीर्याने दखल घेत, शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना तत्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले.
त्यानुसार, गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. गुंडा पथकाने कॉलेजरोडवरील एचपीटी महाविद्यालय, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये धडक मोहीम राबविली.
यावेळी कॉलेज कॅम्पसमध्ये आलेल्या युवकांकडे आयकार्डची चौकशी करण्यात येऊन ज्यांच्याकडे आयकार्ड व कॉलेज कॅम्पसमध्ये येण्याचे ठोस कारण नसलेल्यांना चोप देत ताब्यात घेतले. या टवाळखोरांना पोलिसांनी थेट सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणून प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला.
सदरची कारवाई गुंडा पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सहायक उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, अंमलदार सुनील आडके, राजेश सावकार, डी. के. पवार, कैलास चव्हाण, तुकाराम शेळके, प्रदीप ठाकरे, महेंद्र बेंडकोळी, गणेश नागरे, सचिन पाटील, संदीप आंबरे, बाळासाहेब सोनकांबळे आणि दिनेश धकाते यांच्या पथकाने बजावली.
- एचपीटी-आरवायके महाविद्यालय कॅम्पस
- गोखले एज्युकेशन सोसायटी कॅम्पस
- केटीएचएम महाविद्यालय कॅम्पस
- व्ही.एन.नाईक महाविद्यालय कॅम्पस
- भोसला महाविद्यालय कॅम्पस
पोलिसांचे आवाहन
शाळा, महाविद्यालयांसह शहरात कोठेही टवाळखोरांकडून उपद्रव वा अवैध व्यवसाय सुरू असतील, तर त्याबाबत तात्काळ डायल ११२ यावर संपर्क साधून तक्रार द्यावी.
पोलिसिंगबाबत सूचना असल्यास व्हॉटसॲप क्रमांक ९९२३३२३३११ यावर मेसेज पाठवावा, असे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.