Nashik News : ग्रामीण भागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणून विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने समिती नियुक्ती केली असून, समितीच्या सचिवपदाची जबाबदारी नाशिक जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्यावर सोपविली आहे.
समितीने ग्रामीण भागातील योजनांबाबत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने राज्य शासनाला शिफारशी करायच्या आहेत. (Committee from Village Development for smooth implementation of government schemes Nashik News)
राज्याच्या ग्रामीण भागातील विकासकामांसाठी विविध योजनांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. सदर विकासकामांची अंमलबजावणी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अशा यंत्रणांमार्फत करण्यात येते.
तथापि सदर विकासकामांची अंमलबजावणी वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत करण्यात येत असल्याने व विविध योजनांतर्गत मंजूर कामांचा एकत्रित माहितीकोष (डाटाबेस) उपलब्ध नसल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होतात.
त्यामुळे ग्रामीण भागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणून विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी समितीचे गठण करण्यात आले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सदर समितीने विविध योजनांतर्गत यापूर्वी झालेल्या कामांचा एकत्रित माहिती कोष तयार करणे, कामांची द्विरुक्ती टाळणे, मर्यादित संसाधनांचा योग्य वापर करणे, निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी करणे आदींकरिता संगणकीय प्रणाली,
रिमोट सेन्सिंग, ड्रोन, आय.ओ. टी. स्टार्टअपद्वारे विकसित तंत्रज्ञान आदी आधुनिक तंत्राचा वापर करणे, विविध कामांकरिता प्रचलित सर्व संगणकीय प्रणालीचा एकीकृत वापर करून कार्यप्रणाली सुलभता आणणे आदी मुद्यांबाबत राज्य शासनाला अहवाल सादर करतील.
...अशी ही समिती
धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (अध्यक्ष), जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (विकास), पुणे जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी,
कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, लातूर जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता, सातारा जिल्हा परिषदेचे बांधकाम कार्यकारी अभियंता (समिती सदस्य), तर नाशिक जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता (समिती सदस्य सचिव).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.