Nashik : शहरातील वाहतूक नियोजनासाठी समिती

Joint meeting of Police, Municipal Corporation, Highway Authority
Joint meeting of Police, Municipal Corporation, Highway Authorityesakal
Updated on

नाशिक : शहरातील वाहतुकीचे सुनियंत्रित नियोजनासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त व महामार्ग प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीमध्ये झालेल्या निर्णयात संयुक्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, या समितीची वाहतूक नियोजनासंदर्भात दरमहा आढावा बैठक घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, बैठकीनंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, प्रलंबित ठिकाणी तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सकारात्मकतेने निर्णय घेण्याचे संकेत दिले. (Committee planned for City Transport Planning Nashik Latest Marathi News)

Joint meeting of Police, Municipal Corporation, Highway Authority
Municipal संघटनेचे सूत्रे बडगुजर यांच्या हाती; तिदमे यांची हकालपट्टी

मुंबई नाका पोलिस ठाणे येथे वाहतूक नियंत्रणासंदर्भात पहिल्यादांच आयुक्त जयंत नाईकनवरे व महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. बैठकीत पोलिस आयुक्तांनी शहरातील वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची माहिती देत मुख्य उड्डाणपुलास काही ठिकाणी समांतर छोटे उड्डाणपूल निर्माण केल्यास वाहतूक सुलभ होऊ शकेल.

तसेच, मुंबई नाका येथील वाहतूक सर्कलची रुंदी कमी करणे आणि येथे वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असे सांगितले. तसेच, पावसाळ्यात उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी खालच्या रस्त्यावर पडत असल्याने त्यातून अपघात होतात. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

तर, महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्डे बुजविण्याचे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, असे सांगितले. या वेळी शहर पोलिस, महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाची संयुक्त समिती नियुक्त करून सुनियंत्रित वाहतुकीचे नियोजनासाठी दरमहा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आयुक्त नाईकनवरे, आयुक्त पुलकुंडवार यांनी इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका सर्कल, द्वारका सर्कल या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन वाहतूक कोंडीची पाहणी केली.

तसेच, यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. बैठकीला सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, गंगाधर सोनवणे यांच्यासह पंचवटी, इंदिरानगर, अंबड व मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या प्रमुखांसह वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

Joint meeting of Police, Municipal Corporation, Highway Authority
Crime Update : शहरात 2 मुले, 3 मुलींचे अपहरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.