NMC News : इंडियन सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसकडे महापालिकेचे २० कोटी रुपयांचा कर थकीत आहे. त्यांच्याकडून घरपट्टी न आकारता यापुढे सेवा शुल्क लागू करण्यात येणार असून, त्याची रचना करण्यासाठी महापालिकेने एक समिती स्थापन केली आहे.
समितीमार्फत येत्या १५ दिवसांत दोन्ही ठिकाणच्या जागांची पाहणी करून शुल्क निश्चिती करण्यात येणार आहे. (Committee set up for service fee structure Press owes 20 crore rupees to NMC News)
साधारणतः पाच हजार एकर जागेवर इंडियन सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचा विस्तार आहे. त्यात काही मोकळी जागा, बांधकाम, इमारती, हॉस्पिटल, शाळा आदी प्रकारांमध्ये विभागणी झालेली आहे.
त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तब्बल २० अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, कर, नगररचना विभाग आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे समितीला पाहणी करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल.
त्यात इंडियन सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस यांचेही अधिकारी असणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने २००९ मध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या कार्यालयांकडून सेवा शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानुसार कर रचना ठरवण्यात आली होती. परंतु, हा विषय न्यायालयात गेल्याने यासंदर्भात कर आकारणी झालेली नव्हती. मार्च २०२३ मध्ये न्यायालयाने सेवा शुल्क आकारणीचा आदेश दिल्याने आता त्यानुसार महापालिका ही कार्यवाही करत आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय आणि आयकर विभागाकडे एकूण साडेचार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासंदर्भात महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर आता सप्टेंबरअखेर रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.