Nashik : शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी कमिटी

Nashik City Latest Marathi News
Nashik City Latest Marathi Newsesakal
Updated on

* वास्तुविशारदांना सल्ला देणे गरजेचेच
* आमदार, खासदारांना अभियान राबविणे बंधनकारक
* विद्रूपीकरण होईल अशा राजकीय उपक्रमावर बंदी
*स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर शहर सौंदर्यीकरण अभियान

नाशिक : खासगी किंवा निवासी आस्थापनांचे सौंदर्यीकरण करणाऱ्या वास्तुविशारदांना आता शहर सौंदर्याच्या दृष्टीने सल्ला देणे बंधनकारक ठरणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर शहर सौंदर्यीकरण अभियान राबविले जाणार असून, त्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या कमिटीमध्ये स्थान मिळणार आहे.

याशिवाय शहरी भागातील आमदार व खासदारांनादेखील अभियान राबविणे बंधनकारक आहे. सौंदर्यीकरण अभियान राबविताना शहराचे विद्रूपीकरण होईल अशा राजकीय उपक्रमावर बंदी घालावी लागणार आहे. त्यानिमित्त राजकीय होर्डिंगबाजीला आळा बसणार आहे. (Committee to make beautification of city nashik Latest marathi news)

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शहर सौंदर्याकडे लक्ष देण्यासाठी कमिटी गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेला शासनाचे आदेश प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त, शहर अभियंता, नगररचनाकार, आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी हे कायमस्वरूपी, तर बांधकाम विकसकांच्या संघटना, शैक्षणिक संस्था, वास्तुविशारद, औद्योगिक संस्था हे निमंत्रित सदस्य राहतील. आमदार व व खासदार हे विशेष निमंत्रित राहतील. शहर सौंदर्यीकरण करताना वास्तुविशारद संघटनांकडून अनेकदा शहर सौंदर्यीकरणाच्या निर्णयात सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शहर सौंदर्यीकरण कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Nashik City Latest Marathi News
जळगाव : गणेशोत्सवात विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना - जिल्हाधिकारी राऊत

शहरात एकसारख्या पाट्या

शहर सौंदर्यीकरणात दुकानांवरील पाट्या महत्त्वाच्या ठरतात. पाट्यांची रंगसंगती किंवा ग्राहकांना आकर्षित करण्याचे जाहिरात मानसशास्त्राचा वापर केला जातो. त्यात फक्त एकाच अंगाने विचार होतो. शहराचा विचार मात्र होत नाही. त्यामुळे कमिटीमार्फत शहरातील सर्व दुकानांच्या पाट्या एकाच प्रकारातील रंगसंगतीमध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शहरात एक समान पाट्या नजरेस पडतील.

शहर सौंदर्यीकरण अभियानाची कार्यपद्धती

- अस्वच्छ जागांची निश्‍चिती करून त्या जागांचे सौंदर्यीकरण करणे.
- भित्तिचित्रे, कारंजे, शिल्प उभारणे, जनजागृती चित्र रेखाटने.
- ट्रॅफिक बेट सुशोभीकरण करणे.
- दुभाजक स्वच्छ करणे, दुभाजकांवर शिल्प लावणे, फुलझाडांची लागवड करणे.
- प्रमुख इमारती, शैक्षणिक संस्थांच्या इमारती व हेरिटेज इमारतींवर समर्पक भित्तीचित्र रेखाटने.
- भुयारी मार्ग, पादचारी मार्ग, उन्नत मार्ग, उड्डाणपूल सुशोभित करणे.
- जलाशय स्वच्छ करणे.
- एलईडी प्रकाश योजना व विद्युत रोषणाई करणे.
- झोपडपट्टी व गावठाण स्वच्छता करणे.
- पदपथांवरील सौंदर्यीकरण व एकसारखी बाके टाकणे.

सौंदर्यीकरण करताना विचारात घ्यावयाच्या बाबी

- शहराची परंपरा, इतिहास जोपासावा.
- शहराची नव्याने ओळख करण्यासाठी ब्रॅण्डिंग करावे.
- सौंदर्यीकरण करताना प्लॅस्टिकचा वापर टाळावा.
- महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग घ्यावा.

Nashik City Latest Marathi News
Ankai Fort : आवडते पर्यटनस्थळ; स्वप्नवत सौंदर्यामुळे पर्यटकांचा ओढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.