Nashik News : महामार्गावर मृत्यूचे तांडव कधी थांबणार? अनियंत्रित वेगाला आवर घालणार का?

accidental vehicle
accidental vehicleesakal
Updated on

इगतपुरी (जि. नाशिक) : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून मुंबई- आग्रा महामार्गाची देशपातळीवर ओळख आहे. याच महामार्गाजवळील सह्याद्रीनगर समोर मंगळवारी (ता.१०) रात्री झालेल्या अपघातात बोरटेंभे येथील तीन युवकांना जीव गमवावा लागला.

या अपघातामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अपघातांचे सत्र थांबणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. (Common people expecting busiest mumbai agra highway highway accident incidents increasing nashik news)

मागील वर्षीही (५ जानेवारी २०२२ ) याच महामार्गावर मुंढेगावजवळ झालेल्या अपघातात ३ शिक्षकांना प्राण गमवावा लागला होता. महामार्गावरील अपुऱ्या साधनसुविधा, दिशाहीन दिशादर्शक, गतिरोधकांचा अभाव, सर्व प्रकारच्या वाहनचालकांचा बेशिस्तपणा, हलगर्जीपणा व मनमर्जी, वेगावर नसलेले नियंत्रण यामुळे शिस्तीत चालणाऱ्या गोरगरीबांना नाहक जीवास मुकावे लागत आहे. मुंढेगावजवळ गतवर्षी ५ जानेवारीला नाशिककडून मुंबईकडे जाणारा भरधाव कंटेनर पलटी होवून तो शिक्षकांच्या वाहनावर आदळून शिक्षकांची वाहनाची कोणतीही चूक नसताना त्यांना प्राण गमवावा लागला होता.

यात प्राथमिक शिक्षक धनंजय कापडणीस (जि. प. शाळा, समनेरे), किशोर राजाराम पवार ( जि. प. शाळा, धोंगडेवाडी) व ज्योत्स्ना टिल्लू ( जि. प. शाळा, मालुंजे) यांचा मृत्यू झाला होता. काल झालेल्या भीषण अपघातामुळे या अपघाताचीच चर्चा आज दिवसभर झाली.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

accidental vehicle
Nashik News : मकर संक्रांतीवर महागाईचे सावट; तिळाच्या दरात प्रती किलो 35 ते 40 रुपयांची वाढ

अनियंत्रित वेग हेच कारण?

दोन वर्षापूर्वीही याच महामार्गावर मुंढेगाव येथील चार जणांचा असाच अपघात झाला होता. घोटीहून मुंढेगावकडे येत असताना युवकाच्या दुचाकीला ट्रकने कट मारल्याने अपघात झाला होता. यात तीन शाळकरी बालिका आणि एका युवकाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला होता.

या अपघातात बोरटेंभे येथील प्रभाकर सुधाकर आडोळे,कुशाल सुधाकर आडोळे व रोहित भगीरथ आडोळे हे तरुण जागीच ठार झाले. हे सर्व जण बोरटेंभे येथील रहिवासी असून कौटुंबिक परिस्थिती जेमतेम आहे. या अपघातात एकाच घरातील दोन कर्ते तरुण व एक सख्खा चुलतभाऊ असे मुले गेल्याने बोरटेंभे गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.

accidental vehicle
Nashik News : नदीजोड प्रकल्पात नांदगावला वगळले; DPRमध्ये उल्लेख नसल्याने नाराजीचे सूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()