नाशिक : स्मार्ट सिटीकडून होत असलेल्या कामकाजासंदर्भात आज कंपनी व हिंदुत्ववादी संघटनांच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. उद्या (ता.२८) सकाळी अकरा वाजता तोडलेल्या वादग्रस्त पायऱ्यांच्या ठिकाणीच कंपनीचे अधिकारी व नाशिककरांच्या बैठक होणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने २०२० पासून गोदावरी नदीपात्रात काम करताना सांडव्यावरची देवीचा सांडव्यासह निलकंठेश्वर सुस्थितीत असलेल्या साडेसातशे वर्ष जुन्या पुरातन दगडी पायऱ्या तोडल्या.
या विरोधात नाशिककरांच्यावतीने य. म. पटांगणावर श्रद्धांजली वाहत आंदोलन छेडत कंपनीच्या अधिकाऱ्यांना आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने आज ‘स्मार्ट’ चे सीईओ सुमंत मोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. (company and hindu Organizations meeting about smart city nashik news)
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
जमलेल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींना स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांचा प्रोजेक्टरच्या माध्यमातून आढावा देण्यात आला. निवेदनातील मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यात सांडव्यावरची देवीचा सांडवा बांधून देण्याबाबत जे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते, इतका काळ होऊनही हे काम केले गेले नसल्याचा आक्षेप देवांग जानी यांनी उपस्थित केला. पायऱ्यांचा असलेला पूर्वीच्या सारखा दगड उपलब्ध होत नसल्याने आता राजस्थान भागातील बेसाल्ट दगड वापरून परिसरातील तुटलेल्या पायऱ्या पूर्ववत करून देण्याचे आश्वासन स्मार्ट सिटीकडून देण्यात आले असता त्याला विरोध झाला.
त्यावर सीईओ सुमंत मोरे आणि प्रतिनिधींनी बुधवार (ता.२८) रोजी सकाळी ११ वाजता यशवंत महाराज पटांगण येथे बेसाल्ट दगड आणि पायरीचा दगड याची प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत प्रस्ताव ठेवला असून तो सर्वांनी मान्य केला. बैठकीला देवांग जानी, मामा राजवाडे, रामसिंग बावरी, सागर देशमुख, विनोद थोरात, सुधीर पुजारी, धनंजय पुजारी, नंदू पवार, नवनाथ जाधव, बबलू परदेशी, कैलास देशमुख, नरेंद्र धारणे, रघुनंदन मुठे, पंकज भिंगारे, चिराग गुप्ता, सुहास भणगे तसेच स्मार्ट सिटीचे संजय पाटील, यु. एस. गुप्ता आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.