Noise Pollution During Diwali : कोरोनाच्या 2 वर्षांच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषण अधिक!

Noise Pollution During Diwali 2022
Noise Pollution During Diwali 2022esakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : दिवाळीपूर्वी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रदूषणाबाबत जागृती करण्यात आली. या वर्षी नाशिककरांनी स्वतःहून प्रदूषण कमी करण्याबाबत पावले उचलले. असे आसले तरी गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत ध्वनिप्रदूषण अधिक झाल्याचे आढळून आले. या वर्षी ८०.१ डेसिबल एवढे ध्वनिप्रदूषण झाल्याचे मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे व उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी सांगितले. (Compared to 2 years of Corona noise pollution more this year diwali Nashik News)

दिवाळीत आतषबाजीमुळे ध्वनी व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने केलेल्या चाचणीतून दोन वर्षांचा अहवाल पाहता यावर्षी हवेचे व ध्वनिप्रदूषण जास्त झाल्याची आकडेवारी चाचणीतून लक्षात आली आहे. हवा प्रदूषणासाठी उद्योग भवन, राजीव गांधी भवन, केटीएचएम महाविद्यालय, व्हीआयपी कंपनी, आरटीओ आदी ठिकाणी चाचणी घेतली. तर आवाजाची चाचणी सीबीएस, पंचवटी, दहिपूल, सिडको, बिटको पॉइंट या ठिकाणी घेण्यात आली. या वर्षी नागरिकांमध्ये जागृती झाली.

त्यात प्रसार माध्यमाबरोबर शाळा, महाविद्यालयांत प्रदूषण न करण्याची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ देवून नागरिकांनाही आवाहन केले होते. हवा प्रदूषण करणाऱ्या फटाक्‍यांवरही मंडळाने दिवाळीपूर्वीच चाचणी घेऊन संबंधितांना सूचना दिल्यामुळे घातक फटाक्‍यांना बाजारात बंदी होती. दिवाळीच्या १८ ते २६ तारखेदरम्यान सर्वात जास्त दहिपूल येथे ८०. १ ते सर्वात कमी सिडकोत ५२. ९ डेसिबल ध्वनिप्रदूषण नोंदविले गेले.

Noise Pollution During Diwali 2022
Nashik : घर सोडून गेलेल्यांची पोलिसांमुळे ‘घरवापसी’

ध्वनिप्रदूषणाची आकडेवारी (डेसिबलमध्ये)

कमीत कमी - जास्तीत-जास्त
सीबीएस - ६७. - ७६.६
पंचवटी - ६८. - ७८.५
दहिपूल- ६६,६ - ८०.१
सिडको - ६५.६ -७८.३
बिटको पॉइंट - ६७.७- ७७.७

"या वर्षी जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मंडळातर्फे प्रयत्न केले. असे असले तरी नाशिककरांनी स्वतःहून फटाक्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील सर्वात कमी प्रदूषणाची नोंद नाशिकची झाली आहे."
-रवींद्र आंधळे, प्रादेशिक अधिकारी

Noise Pollution During Diwali 2022
Nashik : ड्रोनच्या घिरट्यांसाठी परवानगी आवश्‍यकच : पोलीस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.