सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील भोकणी शिवारात भोकणी-खंबाळे रस्त्यालगत असलेल्या साबळे वस्तीवरील एका घरात एकटी असणाऱ्या वीस वर्षीय विवाहित महिलेला मारहाण करून दोघा चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून 52 हजारांचा ऐवज लांबवला. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (compensation of 52 thousand delayed by beating woman Incident at Bhokani Nashik Latest Crime News)
प्राजक्ता गणेश साबळे (20) असे चोरट्यांनी मारहाण केलेल्या महिलेचे नाव आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राजक्ता व तिची सासू घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात काम करत होत्या. तर तिचे पती, सासरे व दीर बाहेरगावी गेलेले होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास प्राजक्ता घरी आली तर तिची सासू शेतातच काम करत होती. साडे सहा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी घरात प्रवेश करून प्राजक्तास मारहाण केली. एकाने तिला तोंड दाबून घराच्या बाहेर आणून बसवले.
तर दुसऱ्या चोरट्याने घरातील कपाट व इतर सामानाची उचका पाचक केली. यावेळी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख तीस हजार रुपये रक्कम असा सुमारे 52 हजारांचा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला. मुद्देमाल हातात मिळाल्यावर चोरट्याने बाहेर बसवून ठेवलेल्या प्राजक्ताच्या पोटात जोराची लाथ मारली. व तेथून पोबारा केला. चोरटे निघून गेल्यावर प्राजक्ताने शेजारच्या वस्तीवर धाव घेत घटना सांगितली.
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??
तेथून तिच्या पतीला फोनवरून कळविण्यात आले. अवघ्या दहा मिनिटात घरी आलेल्या पतीने वावी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, हवालदार सतीश बैरागी, नितीन जगताप आदींनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरातील तरुणांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
गेल्याच आठवड्यात वडगाव पिंगळा येथे देखील अशाच प्रकारे सायंकाळी मायलेकास मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती. त्याच पद्धतीने भोकणी येथील चोरीचा प्रकार घडल्याने वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.