Sakal SIILC Seminar : रिअल इस्टेट एजंट व ग्राहक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी ‘महारेरा’ने आता एजंटना व्यवसाय करण्यासाठी सक्षमता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असेल. (Competence certificate for real estate agent free seminar by sakal siilc nashik news)
‘महारेरा’च्या या निर्णयासंदर्भात तसेच प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे, यासंदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य सेमिनार शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी सहाला कान्हेरेवाडी (नाशिक) येथे होईल. सेमिनारमध्ये ‘एसआयआयएलसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित माहेश्वरी व ‘उद्योगवर्धिनी’चे संस्थापक-संचालक सुनील चांडक मार्गदर्शन करणार आहेत.
‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ ही रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षणासाठी ‘महारेरा’ची अधिकृत प्रशिक्षण संस्था आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने २० तासांचे हे प्रशिक्षण पूर्ण करून एजंटला प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नव्याने एजंटचे रजिस्ट्रेशन करताना किंवा रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र आता बंधनकारक आहे.
सेमिनार वेळ : २५ ऑगस्ट, शुक्रवार, सायंकाळी ६
ठिकाण : उद्योगवर्धनी कार्यालय, तिसरा मजला,
निर्माण इन्स्पायर, कान्हेरेवाडी,
जुन्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, नाशिक
सेमिनार नावनोंदणीसाठी संपर्क : ९८८१४६६७६८.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.