NMC Charging Station: चार्जिंग स्टेशनसाठी 7 कंपन्यांत स्पर्धा; पहिल्या टप्प्यात 20 स्टेशनची उभारणी

Electonic vehicle charging station
Electonic vehicle charging station esakal
Updated on

NMC Charging Station : महापालिका हद्दीत सहाही विभागात १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्यांत २० चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत सात कंपन्यांत स्पर्धा आहे. (Competition among 7 companies for NMC Charging Station Construction of 20 stations in first phase nashik news)

शहरातील चार्जिंग स्टेशनसाठी स्पर्धेत असलेल्या सात कंपन्यांनी रस दाखवला असला तरी, दरम्यान स्पर्धेतील कंपनीचा अनुभवासह तांत्रिक गोष्टीची माहिती सादर करताना संबंधित कंपन्यांनी सादर केलेली कागदपत्र तपासणीचे किचकट कामानंतर चार्जिंग स्टेशन समोरील मार्ग मोकळा होणार आहे.

राज्यात १ एप्रिल २०२२ पासून शहरात परिचालित होणारी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीतून खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने असणार आहे.

याकरिता इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देताना शहरात जास्तीत- जास्त चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी दिल्ली येथील यूएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.

त्यानुसार महापालिकेकडून शहरात एकूण १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्यांत वीस चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. याकरिता महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Electonic vehicle charging station
NMC Water Shortage Plan: विभागनिहाय प्रत्येकी 3 टँकर; पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू

३ हजारावर कागदपत्र

इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनमुळे शहरात इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढणार आहे. या वाहनांमुळे प्रदूषणमुक्तीसह पर्यावरण संवर्धनासाठी मोठा उपयोग होणार आहे.

राज्य शासनाच्या महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरणाची काटेकोर अंमलबजावणी महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. विद्युत, बांधकाम आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर विविध कंपन्यांकडून चार्जिंग स्टेशनसाठी निविदा मागवण्यात आल्या.

पहिल्या टप्यातील चार्जिंग स्टेशन होताच पुन्हा दुसऱ्या टप्यातील स्टेशनच्या कामांची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. सात कंपन्यांनी तब्बल ३ हजार कागदपत्रे सादर केली असून ती सर्व महापालिकेला तपासावी लागणार आहेत.

येथे होणार स्टेशन

पहिल्या टप्प्यात सिडको, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक- नाशिक पश्चिम बी. डी. भालेकर शाळेमागील पार्किंग, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, महापालिका खुली जागा, लेखानगर मैदान, अंबड लिंक रोड, अमृतधाम फायर स्टेशन, पंचवटी फायर स्टेशन (सातपूर), राजे संभाजी स्टेडीयम आदी ठिकाणी चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहे.

Electonic vehicle charging station
NMC News: होर्डिंग्ज स्थिरता प्रमाणपत्राची फेरपडताळणी; 41 होर्डिंग्जधारकांना 2 दिवसांची मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.