नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये शहराध्यक्ष व कार्यकारिणी बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करताना माजी नगरसेवकांमधून नियुक्ती करण्याच्या चर्चेने पक्षांतर्गत धुम्मस सुरू झाली आहे.
नगरसेवकपद भूषविलेल्यांना पद देण्यापेक्षा संघटनेत काम करणाऱ्यांची नियुक्ती शहराध्यक्ष पदावर करावी, अशी मागणी होत आहे. (competition among workers from post of BJP city president nashik political news)
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
भाजपच्या शहराध्यक्ष पदाच्या बदलाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल केला जात असल्याचे बोलले जात आहे. शहराध्यक्ष बदलताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांभाळून घेणारे तसेच पक्षाची ध्येय, धोरणे व शासन योजना लोकांपर्यंत पोचविणाऱ्या व्यक्तिमत्वाचा शोध घेतला जात आहे.
निवडणुकीचा विचार करता प्रारंभी ॲड. राहुल ढिकले यांचे नाव होते. परंतु आमदार, खासदारांकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी नको अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्याने ढिकले यांचे नाव मागे पडले. परंतु आता माजी नगरसेवकांमधून काहींना जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असल्याने त्यावरून पक्षांतर्गत वाद सुरू झाले आहेत. संघटनेत काम करणाऱ्यांना पदे देण्याची मागणी होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.