Nashik News: वनविभागाचे कार्यालय चोरीला गेल्याची मनमाड पोलिस ठाण्यात तक्रार! संपूर्ण साहित्य लंपास

Vacant plot at the site of old forest department office at Manmad.
Vacant plot at the site of old forest department office at Manmad.esakal
Updated on

Nashik News : येथील बाजार समितीच्या आवारात असलेल्या वनविभागाच्या कार्यालयाचा पत्ताच नसल्याने हे कार्यालय चोरीला गेल्याची तक्रार मनमाड पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे.

वनविभागाचे जुने कार्यालय हे अज्ञात इसमाने तोडून, त्यातील साहित्य चोरून नेल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तर जुने कार्यालय असलेल्या जागेवर कुठल्याही प्रकारचे कार्यालय नसून केवळ मोकळा भूखंड असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Complaint in Manmad Police Station Forest Department office Complete material stolen Nashik News)

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वनविभागाचे कार्यालय आहे. मात्र अनेक दिवसांपासून हे कार्यालय बंद होते. परंतु बंद असलेले हे कार्यालय जागेवर नसल्याने वनपाल भगवान जाधव (वय ४८) यांनी मनमाड पोलिसात ठाण्यात कार्यालय जागेवर नसल्याची तक्रार दाखल केली आहे.

पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत श्री. जाधव यांनी म्हटले आहे की मनमाड - चांदवड रस्त्यावर असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या भूखंड सर्वे. क्रमांक ३६९ यामध्ये वनविभागाच्या मालकीचे कार्यालय होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vacant plot at the site of old forest department office at Manmad.
Crime News : कॅबमध्ये फोनवर बोलणं पडलं महागात; महिलेला ड्रायव्हरने घातला २२ लाखांचा गंडा! नऊ महिने केली फसवणूक

सदर जुने असलेले कार्यालय अनेक दिवसांपासून बंद होते. मात्र हे कार्यालय अज्ञात व्यक्तींनी तोडून, इमारतीचे दगड व लाकडी साहित्य चोरून नेले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जुने कार्यालय असलेल्या जागी फक्त मोकळा भूखंड आहे.

त्यामुळे हे कार्यालय चोरीला गेल्याने संपूर्ण शहरात याची जोरदार चर्चा होत आहे. मनमाड पोलिस स्थानकात या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.

Vacant plot at the site of old forest department office at Manmad.
Nagpur Crime News: नागपूर पुन्हा हादरलं! सेन्ट्रल जेलमध्ये गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार अन् मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.