Jal Jeevan : जिल्हाभरातून जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत तक्रारी सुरू असताना जिल्हा परिषदेत चांदवड व देवळा तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा झालेल्या आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस पडला.
आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करावी अशा सूचना केल्या.
त्यावर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी २१ व २२ जूनला संबंधित अधिकाऱ्यांनी या मतदारसंघात जाऊन कामांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (Complaints rain in Jaljeevan review Mittal order to inspect works and submit report nashik news)
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (ता.१४) चांदवड व देवळा तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा बैठक झाली. आमदार आहेर, श्रीमती मित्तल, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे याच्यासह या मतदारसंघातील सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सुरू असलेल्या कामांबाबत उपस्थितांनी तक्रारी केल्या. योजनेतंर्गत टाक्या बांधल्या जात आहेत, मात्र या टाक्या कमी क्षमतेच्या आहेत. पाण्याचे स्त्रोत नसताना पाणी पुरवठा योजना घेण्यात आली आहे, त्यामुळे पाणी येणार नसल्याचे सांगण्यात आले.
चुकीच्या पद्धतीने सर्वे केला असून, यात अनेक गावे व वाडया घेण्यात आलेल्या नाही. त्यामुळे ही गावांमध्ये टंचाई राहणार असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. वाकी खुर्द येथील काम अपूर्ण असल्याचे गावातील उपस्थितांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सुरू असलेली काही कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचेही तक्रारीही करण्यात आल्या. आमदार आहेर यांनी कामांबाबत मोठया तक्रारी आहेत. यासाठी प्रशासनाने अधिकाऱ्यांना पाठवून त्याची पाहणी करावी.
काही योजनांबाबत नव्याने सर्वे करून फेर अंदाजपत्रक सादर करावे, काही गावे व वाडया योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. त्यासाठी ४ ते ५ गावांना पाणी मिळेल अशी योजना प्रस्तावित करून त्याचा प्रस्ताव द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या.
श्रीमती मित्तल यांनी चांदवड व देवळा तालुक्यातील कामांची पाहणी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.