नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून शहरातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करताना नाशिक व पंचवटी अमरधाममध्ये बेड्स वाढविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी देताना ३१ मार्चअखेर स्मशानभूमीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. (Complete cemetery works by March end NMC Commissioner instructions Nashik News)
आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी पूर्व, पंचवटी, नाशिक रोड व सिडको या चार विभागातील स्मशानभूमींची पाहणी केली. स्मशानभूमीमध्ये ३१ मार्चअखेर कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अमरधाममध्ये सुशोभीकरण, उद्यानाचे काम करणे तसेच काही ठिकाणी बेड्स वाढविण्याची सूचना केली आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) अंतर्गत मिळालेल्या निधीतून ही सर्व कामे होणार आहेत. पूर्व विभागातील अमरधामची पाहणी केली. तेथील पारंपरिक, गॅस, विद्युत या तिन्ही पद्धतीची पाहणी करून दुरुस्तीच्या काही सूचना केल्या. त्यानंतर पंचवटीतील अमरधाममध्ये नव्याने सुरू होणाऱ्या विद्युतदाहिनीची पाहणी केली.
गोसावी, लिंगायत समाजाच्या दफनभूमीचीही पाहणी केली. नाशिक रोड येथील दसक स्मशानभूमीची पाहणी केली. पारंपरिक, नवीन विद्युतदाहिनीच्या कामाचा आढावा घेतला. सिडको विभागातील उंटवाडी स्मशानभूमीत बेड्सची संख्या वाढविण्याबरोबरच टाइल्स, पिलर्सची त्वरित दुरुस्ती करण्याची सूचना केली.
पंचवटी विभागातील हिरावाडी येथील नाट्यगृह, आडगाव येथील कबड्डी स्टेडीयम, स्मार्टसिटीमार्फत सुरू असलेली महापालिकेच्या भांडार विभागातील पाण्याची टाकी, पं. पलुस्कर सांस्कृतिक भवनच्या कामांची पाहणी करून दिलेल्या मुदतीत, गुणवत्तापूर्ण कामाची सूचना केली.
या वेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, उपअभियंता प्रकाश निकम उपस्थित होते.
‘सीएसआर’अंतर्गत देणगीचे आवाहन
सामाजिक दायित्वाच्या निधीतून नागरिकांना देणगी द्यायची असल्यास ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्वच अमरधाम मधील प्रवेशद्वार व आतील परिसराचे उद्यानासह सुशोभीकरणाच्या सूचना दिल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.