Teacher Transfer : तीन वर्षांपासून जिल्हा अंतर्गत बदल्या झालेल्या नसल्याने अनेक जण बदल्या व्हाव्यात यासाठी इच्छुक होते. राज्यभरातील सर्व जिल्ह्यामध्ये ऑनलाइन जिल्हाअंतर्गत बदल्या पूर्ण झाल्या आहेत.
मात्र जिल्हाअंतर्गत बदल्यांमधील काही जिल्ह्यांतील शिक्षक न्यायालयात गेल्याने सर्वच शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित होऊनही शिक्षक कार्यमुक्त झाले नव्हते.
न्यायालयीन प्रक्रियेत स्थगिती मिळविलेल्या व्यतिरिक्तच्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा आदेश बुधवारी (ता.४) सर्व जिल्हा परिषदांना प्राप्त झाला आहे.
मानवी हस्तक्षेप विरहित झालेल्या बदल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक या बदल्यांमुळे खूश झाले आहे. त्यामुळे आता बदलीपात्र शिक्षक हे कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. (Complete online transfers within district Awaiting teacher dismissal nashik news)
जिल्ह्यांतील टप्पा सहा मधील काही शिक्षकांनी या बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत न्यायालयाकडे दाद मागितली होती. जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी झाल्याने शिक्षक संभ्रमात होते.
बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या पत्रानुसार शैक्षणिक वर्ष संपल्यावर मे महिन्यात कार्यमुक्त करतील या प्रतिक्षेत शिक्षक होते. या संदर्भात ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेकडे मेल पाठवून विचारणा करण्यात येत होती. त्यामुळे ४ मे रोजी शासनाचे पत्र काढत
ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना ऑनलाइन आदेश मिळाले आहेत. त्यांना त्या-त्या शाळेवरून कार्यमुक्त करण्याचा मार्गही या शासन आदेशानंतर मोकळा झाला आहे.
दरम्यान या प्रक्रियेतील याचिकाकर्त्यांना स्थगित मिळाली. ज्यांना स्थगिती मिळाली असे शिक्षक वगळता अन्य शिक्षकांना शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यास आदेशित केले आहे.
दरम्यान या संदर्भात शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्हा अंतर्गत बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्या संदर्भात शासनाचे पत्र प्राप्त झाले असून १५ मे पर्यंत सर्व कार्यवाही करण्यात येईल. १६ मे पासून ते ३१ मे अखेरपर्यंत संबंधित शाळेवर रूजू व्हायचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.