Nashik News : सक्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचा गुन्हा; सोमनाथ तांबे यांचा इशारा

Niphad Sub Divisional Police Officer Somnath Tambe, Tehsildar Eknath Bangale speaking at the peace committee meeting.
Niphad Sub Divisional Police Officer Somnath Tambe, Tehsildar Eknath Bangale speaking at the peace committee meeting.esakal
Updated on

Nashik News : महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सक्तीने वर्गणी मागण्याचे प्रकार हे पोलिसांकडे ऐकीव स्वरूपात आले आहे, पण वाद नको म्हणून परस्पर सामंजस्याने ते मिटविण्यात आल्याने पोलिसांत थेट आलेले नाही.

पण सक्तीने वर्गणी मागण्याच्या तक्रारी आढळल्यास संबंधितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा सज्जड इशारा निफाड उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी दिला. (Compulsory subscription crime of extortion Warning of Somnath Tambe Nashik News)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, तहसीलदार एकनाथ बंगाळे आदी व्यासपीठावर होते.

भैरवनाथ महाराज व रामनवमी उत्सवात नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले नाही म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला.

डॉ. आंबेडकर जयंतीच्या मिरवणूक मार्गातील असुविधा दूर कराव्या तसेच आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी व जयंतीदिनी वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी.

संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे प्रार्थनास्थळावर लागणाऱ्या शुभेच्छा फलकांना समाजकंटकांकडून बाधा पोहोचणार नाही म्हणून रमझानच्या आदल्या दिवशी रात्री एखादा पोलिस बंदोबस्त तेथे तैनात करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली.

सिन्नरच्या अनियमित पाणीपुरवठ्याचा विषयही बैठकीत गाजला. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला.

Niphad Sub Divisional Police Officer Somnath Tambe, Tehsildar Eknath Bangale speaking at the peace committee meeting.
Employment : एशियन कंपनीच्या 80 कामगारांची रोजीरोटी सुरू; उच्च न्यायालय आदेशाची अंमलबजावणी

महात्मा फुले जयंतीच्या दिवशी पुतळ्याची साफसफाई व शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यावर रोषणाई करण्यात यावी अशी मागणी डॉ. विष्णू अत्रे यांनी केली. सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे, प्रा. राजाराम मुंगसे, विनायक सांगळे, मुजाहिद खतीब, आनंदा सालमुठे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज भंडारी, अॅड. भाग्यश्री ओझा, राजेश घुगे, मनीष गुजराथी, डॉ. विजय लोहारकर आदींनी उपयुक्त सूचना केल्या. तहसीलदार एकनाथ भंगाळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

बैठकीस शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद शिंदे, पांडुरंग वारूंगसे, कैलास क्षत्रिय, कल्पना रेवगडे, गौरव घरटे, किरण लोणारे, खंडेराव सांगळे, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे, मीराबाई पेढेकर, कांताबाई गोफणे, चंद्रभान रेवगडे, चंद्रभान पवार, सचिन मिठे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता एस. के. उगले, भगवान सटवे, अमित रायते, पोलिस हवालदार अंकुश दराडे, नवनाथ पवार आदी उपस्थित होते. पोलिस पाटील बाळासाहेब पवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Niphad Sub Divisional Police Officer Somnath Tambe, Tehsildar Eknath Bangale speaking at the peace committee meeting.
NMC Recruitment : महापालिकेत कुठल्याही भरतीसाठी ‘टाटा’ला पसंती! 3 वर्षाचा करार

बैठकीत गाजला पाण्याचा प्रश्‍न

शांतता समितीच्या बैठकीत उत्सवावर चर्चा अपेक्षित असतानाच सिन्नर शहराला जाणवणारा अनियमित पाणीपुरवठ्याच्या विषयाने बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. त्यात मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने वादाची ठिणगी पडली.

रस्त्यातील खड्डे बुजवा, नका बुजवू. आम्हाला पाणीपुरवठा व्यवस्थित करा अशी मागणी बाळासाहेब हांडे यांनी केली. विनायक सांगळे यांनी पोलिसांबरोबरच नगरपालिका प्रशासन नेमके काय करत आहे असा प्रश्‍न उपस्थित केला.

शहरातील अनेक रेस्टॉरंट व काही अपवाद वगळले तर अंडा भुर्जी व चायनीज गाड्यांवर सर्रास देशी विदेशी दारुची बेकायदेशीर विक्री केली जात आहे असा आरोप नामदेव कोतवाल यांनी करून बैठकीतील वातावरण तापवले.

रस्त्यातील खड्डे या विषयावर अनेक वेळेस चर्चा झाली. पण अंमलबजावणी होत नाही असे प्रा. मुंगसे यांनी सांगून नगरपालिकेवर निष्कियतेचा आरोप केला. पुढच्या बैठकीस मुख्याधिकारी असल्याशिवाय बैठक होणार नाही असे सांगून तहसीलदार बंगाळे यांनी बैठक सावरून घेतली.

Niphad Sub Divisional Police Officer Somnath Tambe, Tehsildar Eknath Bangale speaking at the peace committee meeting.
NMC News : व्हॉट्स ॲपवर मिळणार घरपट्टीची देयके; पाणीपट्टी देयके खासगी संस्थेमार्फत वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()