Nashik News : जिल्ह्यात नगरपालिका व महापालिकांचे संपूर्ण कामकाज संगणीकृत झाले आहे. मात्र, जुनाट व नादुरुस्त संगणक, प्रिंटरची अडचण भेडसावत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या निधीतून जिल्ह्यातील दोन्ही महापालिकांसह १७ नगरपालिका व नगरपरिषदांना तब्बल १५० संगणक, १५० प्रिंटर व २९ झेरॉक्स मशीन देण्यात आले.
सोमवारी (ता. २२) येथून या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. (Computers Printers to Municipalities from MLA Daradre Administrative work will speeded up Nashik News)
जिल्ह्यातील अनेक पालिकांकडून आमदार निधीतून हे साहित्य मिळण्याची मागणी आमदार दराडे यांच्याकडे झाली होती. त्याची दखल घेऊन हे संगणकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नाशिक नगरपालिकेला ४५ संगणक व ४५ प्रिंटर, तर पाच झेरॉक्स मशीन देण्यात आले आहेत. मालेगाव महापालिकेलाही पंधरा संगणक व १५ प्रिंटर, तसेच तीन झेरॉक्स मशीन देण्यात आले.
याशिवाय येवला, मनमाड, नांदगाव, सटाणा, देवळा, कळवण, दिंडोरी, चांदवड, निफाड, सिन्नर, देवळाली, भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ व ओझर या नगरपालिका व नगरपरिषदांनाही तीन ते दहाच्या दरम्यान संगणक, प्रिंटर व एक ते दोन झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिले असून, त्यासाठी सुमारे दोन कोटी दहा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
यामुळे सर्वच नगरपालिकांचे संगणकीकृत कामकाज अद्ययावत होणार असून, प्रशासकीय कामकाजांना गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार दराडे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
येवला नगरपालिकेत शुभारंभ
येथील नगरपरिषद कार्यालयास सोमवारी आमदार दराडे यांच्या हस्ते १० संगणक संच, १० प्रिंटर व ३ झेरोक्स मशीनचे वितरण करण्यात आले. प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी कार्यालयीन कामकाजाला गती देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार दराडे यांचे आभार मानले.
माजी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, छाया क्षिरसागर, माजी नगरसेवक दयानंद जावळे, अभियंता जनार्दन फुलारी, मुख्य लिपिक शिवशंकर सदावर्ते यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
"नागरिक विविध स्वरूपाची अनेक कामे महापालिका व नगरपालिकांमध्ये घेऊन येतात. मात्र, अनेकदा या कामांना अडथळेही येतात. जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ही अडचण व्यक्त केली होती. अत्याधुनिक पद्धतीने काम जलद व्हावे, नगरपरिषदेचा कार्यभार संगणीकृत होऊन प्रशासकीय कामाला गती मिळावी, नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी कार्यालयांना संगणक व प्रिंटर उपलब्ध करून दिले आहेत."- नरेंद्र दराडे, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.