Nashik News : पंचवटी, सिडको रुग्णालयासंदर्भात NMCचा ठेंगा!; पालकमंत्र्यांची मध्यस्थी

Dada Bhuse NMC News
Dada Bhuse NMC Newsesakal
Updated on

नाशिक : आमदार किंवा खासदारांकडून एखाद्या प्रकल्पाची मागणी केल्यानंतर व पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेण्याची सूचना दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित प्रश्नांची तड लावणे गरजेची असते. मात्र, पंचवटी व सिडको विभागातील रुग्णालय संदर्भात सूचना देऊनही महापालिकेने कुठलीच हालचाल न केल्याने त्याचे पडसाद नियोजन समितीच्या बैठकीत दिसून आले. पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने जागेचा प्रस्ताव पाठविण्याचे सूचना महापालिकेला देताना निधीसाठी तरतूद करण्याचे आश्वासन दिले. (concern regarding Panchvati CIDCO Hospital Mediation of Guardian Minister Nashik NMC latest Marathi News)

महापालिका हद्दीमध्ये मध्य विधानसभा मतदारसंघ व नाशिक रोड भागांमध्ये सरकारी व खासगी रुग्णालयांची संख्या मोठी आहे. परंतु तुलनेने लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या पंचवटी व सिडको विभागात मात्र रुग्णालय नाही. ही बाब स्थानिक आमदारांनी शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी, तर सिडको विभागात सीमा हिरे यांनी रुग्णालयाची मागणी केली होती. पहिल्याच बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

परंतु महापालिकेकडून या संदर्भात कुठलीच हालचाल झाली नाही. राज्य शासनाकडून निधी मिळत असताना महापालिकेला फक्त जागेचा प्रस्ताव देणे आवश्यक आहे. तीदेखील व्यवस्था न झाल्याने नियोजन समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद दिसून आले. आमदार राहुल ढिकले यांनी पंचवटी विभागातील रस्त्यांसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जागा निश्चित केल्याचे सांगितले, तर हाच धागा पकडून आमदार हिरे यांनीदेखील सिडकोतील रुग्णालया संदर्भात प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Dada Bhuse NMC News
Nashik News : 'MHADA'तील संशयित उमेदवारांमुळे आरोग्‍यची भरती परीक्षा वादात!

प्रस्ताव द्या, निधीची तरतूद

रुग्णालयांच्या जागेसंदर्भात महापालिकेने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्या महापालिकेकडून प्रस्ताव आल्यास जागा निश्चिती करून रुग्णालयांसाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन श्री भुसे यांनी दिले. दरम्यान, योजनेअंतर्गत ४२ कोटी रुपये प्राप्त होऊनही नियोजन होत नसल्याची तक्रार केल्यानंतर बंद दाराआड चर्चा करून भुसे यांनी आमदारांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या निमित्ताने आमदारांमधील खदखद समोर आली.

Dada Bhuse NMC News
Nashik News : आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास!; गॅस पाइपलाइनसाठी 205 km रस्ते खोदकामास परवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.