जुने नाशिक : शहर- जिल्ह्यात दैनंदिन कोरोनाचा (Corona)प्रादुर्भाव वाढत आहे. रविवारी (ता. १६) जणू विस्फोट झाला. जिल्हाभरात सुमारे तीन हजार, तर शहरात सुमारे सतराशे रुग्ण आढळून आले. कोरोना (Covid-19)त्रिसूत्रीकडे होणारे दुर्लक्षामुळे प्रादुर्भाव वाढल्याने बाजारपेठांवर संक्रांत येऊन कडक निर्बंधाचे (strict restrictions)संकट घोंघावत आहे.काही महिन्यांपासून नाशिककर कोरोना प्रादुर्भावास घेऊन अतिशय निर्धास्त झाले होते. जणू काही कोरोनाचे संकट कधी आलेच नव्हते ,अशाप्रकारे वावरत आहे.
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी असलेल्या त्रिसूत्रीकडे सर्रास दुर्लक्ष करत होत आहे. परिणामतः गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. दैनंदिन प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या वाढत आहे. यंदाच्या काळातील शहर- जिल्ह्यात रुग्णांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला. अशीच परिस्थिती किंबहुना यापेक्षाही अधिक भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. हे रोखण्यासाठी नागरिकांसह व्यवसायिकांना कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील यासंदर्भात नाशिककरांना आवाहन करत नियम पाळण्याच्या सूचना केल्या. आतादेखील नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले नाही तर येणाऱ्या दिवसात रुग्ण संख्येचा महाविस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. इच्छा नसतानादेखील प्रशासनास कठोर पावले उचलत कडक निर्बंध किंवा वेळ पडल्यास लॉकडाउन करण्याची वेळ येईल. असे होऊ नये, यासाठी सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या बाजारात नागरिक विनामास्क फिरत आहे. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे. दुकान चालक कर्मचारीदेखील मास्कचा वापर टाळताना दिसत आहे. दुकानांवरील ‘नो मास्क, नो एन्ट्री’ फलक हटले आहे. कोरोना प्रादुर्भावाचा कुठल्याही नियमावलीचे पालन होताना दिसत नाही. हेच ते कारण आहे की पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेवर संक्रांतीचे सावट अर्थात बाजारपेठेत पुन्हा एकदा बंद किंवा वेळेत बदल करण्याची वेळ प्रशासनावर येऊन ठेपली आहे.
‘बाजार समितीतील अतिक्रमण हटवा’
नाशिक बाजार समिती मुख्य बाजार, शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड व नाशिक रोड उपबाजार आवारातील केलेली बांधकामे अनधिकृत असल्याचा दावा नगरसेवक दिनकर पाटील व शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. त्यावर नाशिक महापालिकेने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. महापालिका परिक्षेत्रात बाजार समितीतील आवारातील व नाशिक रोड स्थित उपबाजार आवार येथे गेल्या सहा ते सात वर्षांपासून अनधिकृत बांधकामे केलेली आहे. नगरपरिनियोजन विभाग यांनी बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचा दाखला, मंजूर प्लॅनप्रमाणे सद्यःस्थितीतील जागेची पाहणी करून अनधिकृत व नियमबाह्य कामाचे मार्किंग करून निष्कशित करणे गरजेचे आहे. तरीदेखील सद्यःस्थितीतील बांधकामाची शहनिशा करून नियमबाह्य कामे त्वरित काढण्यात यावी व नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे पत्र नगरसेवक पाटील व शिवाजी चुंभळे यांच्या सहीनिशी देण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.