Nashik : सिडकोत छत्र्या घेऊन रस्त्याचे काँक्रिटीकरण

Concreting of the road in full rain.
Concreting of the road in full rain.rsakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : सिडकोमधील जुन्या प्रभाग २९ मध्ये पावसातच नुकत्याच काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याची पुन्हा वाताहत झाली. पुन्हा हे रस्ते फोडून पावसातच काँक्रिटीकरण करणे सुरू झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. हा नेमका काय प्रकार सुरू आहे, याबाबत आता परिसरात चर्चा सुरू झाली आहे. (Concreting of road in rain with umbrellas in Sidko Nashik Latest Marathi News)

दरम्यान, यााबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेने तीव्र भूमिका घेतली असून, प्रशासनाने या निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून नेमका प्रकार समोर आणावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

सिडकोमधील जुना प्रभाग २९ मधील खंडेराव चौक ते साईबाबानगर, समता चौक ते तानाजी चौक परिसरात ९ मीटर रुंदी असलेला रस्त्यांचे कॉंक्रिरेटीकरण गेल्या सहा महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे, अशी सर्वांची तक्रार आहे.

काही ठिकाणी काँक्रिटीकरण केले. मात्र, ते इतके निकृष्ट दर्जाचे झाले,की या पावसातच ते उखडून गेले. काँक्रिटीकरण तोडून पुन्हा एकदा भरपावसातच छत्र्या घेऊन ते करण्याचा प्रकार सुरू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ही बाब कळल्यानंतर सिडकोमधील मनसेचे पदाधिकारी तेथे पोचले. त्यांच्या म्हणण्यानुसार, वास्तविक पाहता हे काम चार महिने अगोदर पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होते. मात्र, जाणीवपूर्वक हे काम लांबविण्यात आले व याचा त्रास परिसरातील राहिवासींना होत आहे. परिसरातील दोन्ही बाजूंच्या घरांचे नुकसान झाले आहे.

घरापुढील पायऱ्या तोडल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना घरातून बाहेर येण्यास, चढउतर करण्यास त्रास होत आहे. संबंधित अधिकारी, तसेच स्थानिक नगरसेवकांना काही देणंघेणं नाही व निव्वळ जनतेला वेड्यात काढले जात असून, जनतेचा कररूपी पैसा खड्यात घालत आहेत.

Concreting of the road in full rain.
अण्णाभाऊ साठे चौक ते गंजमाळ सिग्नल खड्डेमय!

परीसरातील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे रस्त्यासंदर्भात तक्रार केली व त्या अनुषंगाने मनसेचे सिडको विभागातील पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्या दरम्यान निकृष्ट दर्जाचे काँक्रिट मटेरियल वापरल्यामुळे रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला आहे व काही ठिकाणी उघड्यावर वीजतारा आढळून आल्या.

उघड्या तारांमुळे यापूर्वीही दुर्घटना होऊन काही नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व गंभीर बाबींचा विचार करून प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा मनसेचे शहर संघटक अर्जुन वेताळ, शहर चिटणीस संदीप दोंदे, कैलास मोरे, संदीप बोरसे, तुषार जगताप, अक्षय खांडरे, शहर संघटक देवचंद केदारे, शंकर कनकुसे आदींनी दिला आहे.

Concreting of the road in full rain.
सच की पाठशाला : एक निष्ठावान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.