Nashik News : मंदिर स्थळावरील कॉंक्रिटीकरणाचे काम निकृष्ट; कंधाणे ग्रामस्थांचा आरोप

Concreting work
Concreting workesakal
Updated on

Nashik News : येथील अंबिका माता मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपयांच्या निधीतून संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संपूर्ण कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Concreting work on temple site poor Allegation of Kandhane villagers Nashik News)

पंचक्रोशीतील जागृत देवस्थान अंबिका माता मंदिराच्या सभामंडपातील कॉंक्रिटीकरणासाठी वीरगाव गटाच्या सदस्या साधनाताई गवळी यांच्या प्रयत्नातून तत्कालीन पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून पंचवीस लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला होता.

त्यानुसार संबंधित विभागामार्फत कॉंक्रिटीकरणाचे काम ठेकेदाराला देण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराकडे ग्रामस्थांनी कामाचा आराखडा व कार्यरंभ आदेशाची वारंवार मागणी केली असता त्याने ते देण्यास नकार दिला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Concreting work
Dr. Ambedkar Jayanti : उत्सवाच्या सांगता मिरवणुकीत जयभीमचा गजर; तरुणाई उत्साहाच्या लाटेवर स्वार!

त्यानंतर याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली असता कॉंक्रिटीकरणाचे काम तीन थरात मंजूर असताना एकच थर व जाडी अतिशय कमी प्रमाणात असलेले कॉक्रिटीकरण करण्यात आले असून त्यासाठी वापरली जाणारी वाळू व खडी निकृष्ट दर्जाचे व सिमेंटचा कमी प्रमाणात वापर केल्याचे आढळून आले आहे.

या कामात लाखोचा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे ग्रामस्थ यांनी केली आहे. निवेदनावर माजी उपसरपंच कारभारी बिरारी, वसाकाचे माजी संचालक बाळासाहेब बिरारी, अमृता बिरारी, अभिमन बिरारी, किरण पाटील, बापू चव्हाण आणि ग्रामस्थ यांनी स्वाक्षरी केली आहे.

Concreting work
Dr. Ambedkar Jayanti : महामानवाला अभिवादनासाठी मुक्तीभूमीवर लोटली गर्दी..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.