NMC Water Supply: नाशिककरांना दिलासा! पाणीटंचाईचा ‘सामना’ टळणार; पाणीपुरवठा विभागाकडून दावा

Water Resources Department of Maharashtra
Water Resources Department of Maharashtraesakal
Updated on

NMC Water Supply : ऑगस्टअखेर शहराला एक हजार ५८० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्‍यकता असताना धरणांमध्ये सद्यःस्थितीत तेराशे दशलक्ष घनफूट आरक्षित पाणी शिल्लक आहे. २८० दशलक्ष घनफूट पाण्याची तहान इतर संस्थांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यातून भागविण्याचे नियोजन आहे.

मात्र ऑगस्ट महिनाअखेर पाऊस न पडल्यास अशी स्थिती येणार असल्याने नाशिककरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. (confrontation of water shortage will avoided Claim from nmc Water Supply Department nashik news)

जलसंपदा विभागाने शहरासाठी तीनही धरणे मिळून पाच हजार ८०० दशलक्ष घनफूट नियमित पाणी आरक्षण दिले आहे.

त्या व्यतिरिक्त वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून दोनशे, दारणा धरणातून शंभर असे तीनशे दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी आरक्षण दिले आहे.

एकूण सहा हजार १०० दशलक्ष घनफूट आरक्षित पाण्यापैकी १ ऑक्टोंबर २०२२ ते आत्तापर्यंत चार हजार ७४६ दशलक्ष घनफूट पाणी धरणातून उपसण्यात आले आहे. पाण्याचे आरक्षण २४० दिवसांसाठी असते. पावसाळ्याच्या कालावधीत पाणी आरक्षित केले जात नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Resources Department of Maharashtra
NMC News : मनपा प्रशासनाधिकारी पदासाठी फिल्डींग!

सद्यःस्थितीत तीनही धरणात तेराशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. ३१ ऑगस्टअखेर आरक्षित पाणी असल्याने या पाणी वापर लक्षात घेता शिल्लक असलेले पाणी पुरणार नाही.

त्यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट घोंघावत असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात तशी कुठलीच परिस्थिती निर्माण होणार नसल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे.

तर इतर संस्थांचे पाणी उचलणार

धरणामध्ये पाण्याचा शॉर्टफॉल दिसून येत असला तरी ३१ ऑगस्टपर्यंत पाऊस पडणारच नाही, अशी स्थिती अजिबात नाही. सध्या धरणांच्या क्षेत्रात पावसाची स्थिती आहे. पाऊस पडलाच नाही तर एमआयडीसी तसेच एकलहरेसाठी आरक्षित असलेले पाणी गंगापूर धरणातून उचलण्याची तयारी आहे.

Water Resources Department of Maharashtra
NMC News : कर न भरल्यास जुलैपासून 2 टक्के शास्ती; अडीच महिन्याच्या कालावधीत 77 कोटीची वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.