हॉल तिकीटवर तारीख आजची, पण परीक्षा तर कालच झाली! नाशिक, नागपूरात बीएड प्रवेश परीक्षेवेळी गोंधळ

Confusion during BEd entrance exam 2023 in nashik and nagpur  dates of bed entrance Exam r
Confusion during BEd entrance exam 2023 in nashik and nagpur dates of bed entrance Exam r
Updated on

नाशिक आणि नागपूर शहरात बीएडच्या प्रवेश परीक्षेवेळी गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आगे. नाशिकमध्ये बीएडच्या सीएटी परीक्षेत गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला जेव्हा परीक्षेच्या हॉलतिकीटावर आजची तारीख असल्याने परिक्षार्थी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले. या विद्यार्थ्यांना ही परीक्षा २५ एप्रील रोजी म्हणजे कालच झाल्याचं सांगण्यात आलं. यामुळे गोंधळाची परिस्थीत निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.

हॉल तिकीटवर आजची तारीख असल्याने परीक्षार्थी परीक्षेसाठी आले. मात्र ही परीक्षा 25 तारखेला म्हणजे कालच झाल्याचं त्यांना परीक्षा केंद्रावर सांगण्यात आलं. यानंतर शिक्षक मतदारसंखाचे आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. यानंतर हे परिक्षार्थ्यांना इतर दोन महाविद्यालयांमध्ये हलवण्यात आलं. त्यामुळे आता सकाळी अकरा वाजता या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. एबीपी माझाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

Confusion during BEd entrance exam 2023 in nashik and nagpur  dates of bed entrance Exam r
CM शिंदे सुट्टीवर जाताच मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच सुरू;अजितदादांनंतर फडणवीसही 'भावी मुख्यमंत्री'

नागपूरमध्येही विद्यार्थ्यांना मनस्ताप

नाशिक प्रमाणे नागपूर येथे देखील असाच गोंधळाचा प्रकार समोर आला आहे. हॉलतिकीटमध्ये आजची तारीख आणि ठिकाण दिलेले असताना परीक्षेसाठी पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालच झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आज सकाळपर्यंत सीईटी सेलच्या वेबसाइटवर आजचं वेळापत्रक दिसत होतं. मात्र सकाळी नऊ वाजता ते बदलून आता कालची तारीख दाखवली जात आहे.

दरम्यान या बदलांचा कुठलाही मेल किंवा मेसेज आला नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Confusion during BEd entrance exam 2023 in nashik and nagpur  dates of bed entrance Exam r
Mukesh Ambani : निष्ठावान सहकाऱ्याला अंबानींचं जम्बो गिफ्ट! दिलं १५०० कोटींचं घर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.