MSRTC Women Ticket discount: ऑनलाइन तिकीट बुकींगवर 50 टक्के सवलतीबाबत संभ्रम; खासगी ॲप्लिकेशनवर येताय अडचणी

MSRTC Women Ticket discount
MSRTC Women Ticket discountesakal
Updated on

MSRTC Women Ticket discount : राज्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांसाठी सरसकट पन्नास टक्के सवलत दिल्यापासून महिलांची प्रवासासाठी गर्दी वाढली आहे.

वाढत्या प्रतिसादामुळे बस भरभरून वाहत असल्या तरी, काही खासगी ॲप्‍लिकेशनवरुन ऑनलाइन तिकीट बुकिंग केल्यास ही सवलतीचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. (Confusion over 50 percent discount on online ticket booking women msrtc Problems facing private applications nashik news)

राज्यात परिवहन महामंडळाच्या बसप्रवासात महिलांसाठी पन्नास टक्के सवलतीचा निर्णय झाला आहे. बसप्रवासासोबत परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावरून तिकीट बुकिंग केल्यानंतरही राज्यातील बसप्रवासात सवलत मिळते.

मात्र, काही खासगी ॲप्लिकेशनवर अजूनही जुन्याच पद्धतीचे बुकिंग होत असल्याने सवलतीपासून वंचित राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहे.

देशातील प्रवासासंदर्भातील अनेक ॲप्लिकेशन आहेत. त्यात, राज्य आणि देश पातळीवर नेटवर्क असलेल्या ॲप्लिकेशनचा त्यात समावेश आहे. कुठल्याही राज्यातून कुठल्याही राज्यातील प्रवासासाठी तिकीट बुकिंग करण्याची सोय असलेल्या अशा सगळ्याच ॲप्लिकेशनमध्ये महाराष्ट्रातील महिला सवलतीचा हा नियम लागू झाल्याचे दिसत नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

MSRTC Women Ticket discount
Nashik BJP News : भाजप कार्यकारिणीत नाशिकला ठेंगा!

विशेषतः: काही खासगी ॲप्लिकेशनवर अजूनही महिलांसाठी पन्नास टक्के सवलतीचे तिकीट न मिळता पूर्वीच्या दराने तिकीट मिळत असल्याच्या तक्रारी आहे. ठाणे ते नाशिक दरम्यान तीन दिवसांपूर्वी प्रवास करणाऱ्या शहरातील एका दांपत्याने त्यांचा अनुभव सांगितला.

अभी ॲप्लिकेशन नावाच्या ॲप्लिकेशनवर ऑनलाइन तिकीट बुकिंग केल्यानंतर त्यात, महिला सवलतीचा कुठलाही उल्लेख नाही. सरसकट दोन प्रवासी म्हणून तिकीट आकारले गेले आहे. अशी तक्रार मांडली.

चौकशी करू

या संदर्भात राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय अधिकारी अरुण सिया यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठल्याही संकेतस्थळावरुन तिकीट बुक केल्यास ही सवलत मिळायला हवी. तशा सुधारणा केल्या आहेत. मात्र त्यानंतरही अडचणी असल्यास वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून चौकशी केली जाईल, असे सांगितले.

MSRTC Women Ticket discount
Bosch Employees : ‘बॉश’कडून कामगारांना कामावर घेण्यास नकार; कर्मचाऱ्यांचा लढा चालू ठेवण्याचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.