Diwali 2023: फटाक्यांच्या आवाजांवर निर्बंध; कारवाई कोण करणार यावर संभ्रमावस्था

diwali-firecrackers
diwali-firecrackers
Updated on

Diwali 2023 : देशभरातील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होत असते. दिवाळीत फटाके वाजविण्यावर वेळेचे निर्बंध लादण्यात आले आहेत; परंतु गेल्या काही वर्षांत आता दिवाळीच्या दिवसांमध्ये वेळेच्या मर्यादेनंतरही फटाक्यांची आतषबाजी होते.

यातून दोन्ही प्रदूषणांसह वायू प्रदूषणही होते; परंतु निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई कोणी आणि कशी करावी, याची संभ्रमावस्था असतानाच प्रशासनासमोर कायमच आव्हान राहिले आहे. दिवाळीत वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निर्बंध लादून दिलेले आहेत. (Confusion over who and how to take action against violators of restrictions on firecrackers noise nashik news)

त्यात महत्त्वाचे म्हणजे रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत फटाके वाजविण्यास बंदी आहे. त्याचप्रमाणे ११५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. असे असतानाही लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडवा या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते.

यासंदर्भात नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते; परंतु पोलिस असो वा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग यांच्याकडून ठोस कशी कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे नियम करूनही त्याचे सर्रास उल्लंघन होते.

मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली जाते. पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ नोंदी घेऊन सरकारी कारवाई पूर्ण करते. परिणामी, वायू प्रदूषणाचा प्रश्न कायम राहतो.

diwali-firecrackers
Farmer Protest: कर्ज वसुलीविरोधात नागपुरात अन्नत्याग आंदोलन; शेतकरी संघटना समन्वय समितीचा आक्रमक पवित्रा

असे आहेत निर्बंध

- फटाके उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यावर बंदी 
- साखळी फटाक्यांच्या आवाजात ११५ डेसिबलपर्यंत मर्यादा असावी
- न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री आठ ते दहा या वेळेत फटाके उडविण्यास परवानगी राहील 
- आपटबार व उखळी दारू उडविण्यास बंदी असून, परदेशी फटाके विक्री आणि बाळगण्यासही बंदी आहे 
- दहा हजारांपेक्षा जास्त लांबीच्या फटाक्यांच्या माळेवर बंदी आहे

आव्हान कायम

दरवर्षी पोलिस प्रशासनाकडून फटाके वाजविण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते; परंतु या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही. रात्री दहानंतर फटाके वाजविणारे शोधायचे कसे आणि गुन्हा दाखल करायचा कसा, याचे आव्हान पोलिसांसमोर कायम उभे राहिले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण पुढे करीत याबाबतच्या अंमलबजावणीपासून पळ काढतो.

diwali-firecrackers
Nashik News: रोजगार हमीवरील मजुरांची यंदाची दिवाळी अंधारात; मजुरीचे थकले 8 कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.