Nashik Doctor Bharti : डॉक्टरांच्या भरतीसंदर्भात पेच; शासनाकडून मागविले मार्गदर्शन

Nashik Doctor Bharti : डॉक्टरांच्या भरतीसंदर्भात पेच; शासनाकडून मागविले मार्गदर्शन
esakal
Updated on

Nashik Doctor Bharti : राज्य शासनाने वैद्यकीय विभाग व अग्निशमन दलाची पदे भरण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. परंतु तांत्रिक कारणामुळे पदे भरली जात नाही. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे ८४ डॉक्टरांची भरती एमपीएससी की ‘टीसीएस’ मार्फत करावी, या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच ‘टीसीएस’ मार्फत वैद्यकीय विभागाची पदे भरली जाणार आहे. (Confusion regarding recruitment of doctors in nashik news)

राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना रिक्तपदे भरण्यासंदर्भात नियमावली आखून दिली आहे. त्यामध्ये ३५ टक्क्यांच्या वर महसुली खर्च जात असेल तर रिक्तपदे भरू नये, अशा स्पष्ट सूचना आहे. मात्र कोरोनाकाळात रिक्तपदे भरण्यासंदर्भात नियमावली शिथिल करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय व अग्निशमन दलाची या महत्त्वाच्या विभागातील रिक्तपदे तातडीने भरण्यास परवानगी दिली.

मात्र दोन्ही विभागातील पदे भरताना टीसीएस किंवा आयबीपीएस या त्रयस्थ संस्थामार्फत पदे भरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नाशिक महापालिकेने टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत पदे भरण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Doctor Bharti : डॉक्टरांच्या भरतीसंदर्भात पेच; शासनाकडून मागविले मार्गदर्शन
Doctors Village Gharivali : डॉक्टरांचे गाव घारीवली! जिल्हा परिषद शाळेतून घडले 20 डॉक्टर

महापालिका व ‘टीसीएस’मध्ये तसा करार करण्यात आला. वैद्यकीय विभागातील ६७१ पदे भरताना तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामध्ये ५८७ या ‘ब’ व ‘ड’ संवर्गातील पदे टीसीएसमार्फत भरता येणे शक्य आहे. मात्र ८४ डॉक्टरांची पदे ‘अ’ संवर्गात येतात. ती पदे एमपीएससी मार्फतच भरावी लागत असल्याने अडचण निर्माण झाली आहे.

शासनाला स्मरणपत्र

वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र डॉक्टर ‘अ’ संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा स्मरणपत्र सादर केले आहे.

"डॉक्टर संवर्गातील पदे ‘टीसीएस’ की ‘एमपीएससी’मार्फत भरावी, यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी स्मरणपत्र पाठविले आहे." - लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त, महापालिका.

Nashik Doctor Bharti : डॉक्टरांच्या भरतीसंदर्भात पेच; शासनाकडून मागविले मार्गदर्शन
Arogya Bharti 2023 : 11 हजार जागांसाठी आरोग्य भरतीची जाहिरात निघाली; जुन्या परीक्षार्थींना पुन्हा करावा लागणार अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.