Nashik Congress News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडलेली असताना नाशिकमध्ये होर्डिंग वॉर सुरू झाले असून, यामध्ये आता काँग्रेसनेदेखील उडी घेतली आहे.
राज्यातील बदलत्या घडामोडीचा फायदा घेत सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसच्या नावाखाली अफवा, आमदारांची खरेदी- विक्री आणि लोकांनी निवडलेले सरकार पाडणे या विरोधात शहर काँग्रेसने होर्डिंग लावले आहे.
काँग्रेस भवन महात्मा गांधी रोड, द्वारका सारडा सर्कल, सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर, जुने नाशिक अशा विविध ठिकाणी काँग्रेसकडून लावलेले या होर्डिंगने नाशिककरांचे लक्ष वेधले आहे. (Congress jumped in hoarding war Hoardings across city saying Now bring Congress nashik political)
सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय उलथापालथीमध्ये राजकारणावर व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाडण्यात आलेली फूट हा चिंतेचा विषय आहे. याबाबत सामान्य नागरिक अत्यंत संतप्त झाला आहे. या परिस्थितीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये होर्डिंग लावले आहेत.
‘आता काँग्रेस म्हणू...काँग्रेसच आणू’ अशी टॅगलाइन असलेल्या या होर्डिंगबाबत शहराध्यक्ष आकाश छाजेड म्हणाले, भाजप पक्ष काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अत्यंत घाबरला आहे. त्यामुळे तो विविध अपप्रचार करीत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महाराष्ट्रात शिवसेना आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली. हे अनैतिक राजकारण लोकांना पसंत पडलेले नाही. त्यामुळे या स्थितीत काँग्रेस हाच लोकांसाठी वैचारिक आणि सामान्यांच्या हिताचा विचार करणारा पक्ष आहे, हा संदेश आम्ही देत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात भाजपने प्रारंभी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यासाठी शिवसेनेत फूट पाडली. या वेळी खोक्यांचे राजकारण झाल्याचे बोलले जाते.
हे सर्व लोकांचा कौल व संस्कृतीच्या विरोधात असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. होर्डिंगच्या माध्यमातून जनतेला हेच दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.