Nana Patole News : मुजरा करणारे नको, रिझल्ट देणारे पाहिजेत; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या कानपिचक्या

State President Nana Patole while speaking at North Maharashtra review meeting of Congress.
State President Nana Patole while speaking at North Maharashtra review meeting of Congress.esakal
Updated on

Nana Patole News : काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांची चांगलीच शाळा घेतली. बूथ कमिट्या किती, बैठका घेतात का, पक्षांतर्गत विविध सेल, कार्यकारिणी तयार केली का, अशी विचारणा पटोले यांनी करत प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली.

पदे घेऊन पक्षाच्या बैठकांना न येणारे नामपात्र पदाधिकारी पक्षाला नको आहेत, तळागाळात काम करणारे कार्यकर्ते पाहिजे आहेत. केवळ मुजरा करणारे नको आहे, रिझल्ट देणारे पक्षात पाहिजे, असा पदाधिकारी दिसल्यास शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना जबाबदार धरले जाईल, अशा सज्जड इशारा देत त्यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. तळागाळात जाऊन संघटना मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. (congress state president Nana Patole questioned city president and district president nashik news)

काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक सोमवारी (ता. ९) औरंगाबाद रोडवरील जय शंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे झाली. प्रदेशाध्यक्ष पटोले, विधिमंडळ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे, सहप्रभारी ब्रिज किशोरदत्त उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, डॉ. शोभा बच्छाव, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अनिलकुमार आहेर, प्रदेश पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, शरद आहेर, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, संपत सकाळे आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला. सुरवातीला नाशिक जिल्हा व शहराचा आढावा घेण्यात आला.

अधिकाधिक नोंदणी करून घ्या

जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे यांना संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून पटोले यांनी काही प्रश्न केले. बूथ कमिट्या केल्या. मात्र, त्यांची प्रदेश पातळीवरून पडताळणी केली जाईल. केवळ कागदावर कमिट्या नको आहेत. दर महिन्याला पक्षाची बैठक झाली पाहिजे, त्यासाठी कार्यालयातील रजिस्टर तपासणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

त्यामुळे नाशिक जिल्हा ग्रामीण काँग्रेसने दोन महिन्यांत, तर शहर काँग्रेस कमिटीला एक महिन्याचा वेळ देत असून, यापुढे आता फ्रंटल, बूथच्या अधिकाधिक सदस्यांची नोंदणी करून घ्यावी, असे जिल्हाध्यक्ष डॉ. शेवाळे व शहराध्यक्ष छाजेड यांना सांगितले.

State President Nana Patole while speaking at North Maharashtra review meeting of Congress.
Nana Patole: नाना पटोलेंना धक्का! समन्वय समितीसाठी दिलेली नावे वरिष्ठांनी नाकारली; कारण आलं समोर

संघटनात्मक बांधणी भक्कम होण्याची गरज आहे. पक्षबांधणी झाल्यास, शेतकऱ्यांना न्याय देता येईल. पक्षाच्या बैठकांना सलग तीनवेळा अनुपस्थित राहिल्यास त्यांना घरचा रस्ता दाखवा. कमी काम असणाऱ्या ब्लॅाकला समज द्या, काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा अहवाल द्या, पदे घेऊन पक्षासाठी काम न करणारे पदाधिकारी नको, असेही पटोले यांनी सुनावले. मुंबई वाऱ्या करून मुजरा करण्यापेक्षा पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी काम करा, पदाधिकाऱ्यांचा सन्मान करा, पक्षांतर्गत विरोधी वक्तव्य करू नका, प्रत्येकाला पक्षात काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, स्वाती जाधव, उल्हास सातभाई, डॉ. सुभाष देवरे, राजेंद्र बागूल, रमेश कहांडोळे, ॲड. संदीप गुळवे, वत्सला खैरे, हनीफ बशीर, बबलू खैरे, लक्ष्मण जायभावे, विजय राऊत आदी उपस्थित होते.

किती दिवस प्रभारी अध्यक्ष?

बैठकीत पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी दिली असता केशवअण्णा पाटील यांनी नाशिक शहराला किती दिवस प्रभारी अध्यक्ष देणार, असा प्रश्न करीत तुम्हाला प्रभारीच अध्यक्ष द्यायचा आहे का, अशी विचारणा केली. पक्षात काम करून आम्हाला पदे मिळत नाहीत, तिकीट मिळत नाही, अशा भावना व्यक्त करत आम्ही कधी पदाधिकारी होऊ की नाही, असा उद्विग्न सवाल केला. त्या वेळी सभागृहाने टाळ्या वाजवत त्यांना साथ दिली.

State President Nana Patole while speaking at North Maharashtra review meeting of Congress.
Nana Patole : दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री पदावर डोळा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला दावा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.