Nashik News : सुरतला निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची अडवणूक

District Youth Congress President Swapnil Patil along with former Assembly Speaker Javed Pathan going to Surat
District Youth Congress President Swapnil Patil along with former Assembly Speaker Javed Pathan going to Suratesakal
Updated on

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत येथे जात असताना सोमवारी (ता. ३) नाशिक शहर- जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांना दिवसभर धरमपुर (गुजरात) पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. (Congress workers going to Surat are obstructed Nashik News)

राहुल गांधींना पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध राज्यांतील कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्ते सुरतच्या दिशेने रवाना झाले. मात्र, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवत अटक केली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले.

यामध्ये नाशिकच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नाशिकच्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवले. त्यानंतर त्यांना अटक करत धरमपुर पोलीस ठाणे (वलसाड) येथे ठेवण्यात आले.

यामध्ये पाटील यांच्यासह पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण, मध्य विधानसभा अध्यक्ष जयेश सोनवणे, वकील सेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. कोनिक कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कोठूळे आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

District Youth Congress President Swapnil Patil along with former Assembly Speaker Javed Pathan going to Surat
Market Committee Election : बाजार समित्यांसाठी विक्रमी 2420 अर्ज दाखल; दिग्गजांच्या अर्जाने निवडणुकीत रंगत

पोलिसांची दंडेलशाही

काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते. पण सुरत शहर व आपसासच्या परिसरात भाजप सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये, यासाठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते.

मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणारे काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

District Youth Congress President Swapnil Patil along with former Assembly Speaker Javed Pathan going to Surat
NMC News : गाळ्यांच्या भाडे दरात व्यावसायिकांना 15 टक्के दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.