ब्राह्मणगाव (जि.नाशिक) : माध्यमिक शाळेचे शिक्षक व प्रगतिशील शेतकरी भूषण अहिरे यांनी शाळा व शेती या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत मोडी लिपी संवर्धनासह पुरातन नाण्यांचा संग्रह करण्याचा अनोखा छंद जोपासला आहे. या छंदामुळे शासनाच्या जुन्या मोडी लिपीतील काही लेख व माहितीसाठी त्यांची मदत होत आहे.
मोडी लिपीचा छंद
महाराष्ट्रात सुमारे १२ व्या शतकापासून मोडी लिपीची सुरवात झाली. न मोडता न थांबता झरझर लिहिली जाणारी मोडी लिपी १९६० नंतर कालबाह्य झाली. शिवकाळ व पेशवे काळात वापरली जाणारी मोडी लिपी आता वाचणारे व लिहिणारे खूप दुर्मिळ आहेत. ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील भूषण अहिरे यांनी ऐतिहासिक लिपी संवर्धनाचे काम सुरू ठेवले आहे. ते लखमापूर येथे शिक्षक आहेत. ते स्वतः पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन विभागाकडून प्रशिक्षण घेऊन दहा वर्षांपासून लोकांची मदत करत आहेत. तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यातील मोडी दस्तालेख नोंदी वाचण्याचे काम करतात. शालेय शिक्षणापासून त्यांनी मोडी लिपीचा छंद जोपासला आहे. अनेक दुर्मिळ पुरातन नाण्यांचा संग्रह करून पुढील पिढीला माहिती व्हावी, म्हणून वेळोवेळी विविध शाळेत जाऊन प्रबोधन करतात. अनेक शासकीय विभागांत असणारी मोडी दस्ताऐवज तसेच ऐतिहासिक कागदपत्रे वाचनात आल्याने लोकांची मदत होत आहे.
दहा वर्षांपासून मोडी दस्ताऐवजांचे वाचन करत आहे. शासकीय दफ्तरातील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शंभर वर्षांपूर्वीचे दाखले वाचन करून लोकांची मदत करताना मिळालेले समाधान हेच आपले मानधन आहे.
- भूषण अहिरे, मोडी लिपीवाचक, ब्राह्मणगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.