Nashik News : श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती-अष्टादशभुजा महिषासूर मर्दिनी श्री सप्तशृंग देवीच्या मूर्ती संवर्धनाच्या कामातून निघालेला १ हजार ८५० किलो शेंदूरचे काय होणार? याबद्दलची उत्सुकता भाविकांमध्ये होती.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी विश्वस्त मंडळाने त्याचा उफयोग करून मंदिराच्या पहिल्या पायरीवर प्रवेशद्वाराच्या मध्यभागी पंधरा फूट उंच शेंदूर स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचे काम सुरु झाले असून दोन ते अडीच महिन्यांमध्ये विधीवत पूजनाने तो भाविकांसाठी खुला होईल. (Construction of Shendur Pillar on Saptashrungi Fort opened for devotees ritual worship in two and a half months Nashik News)
मूर्तीवरील जवळपास दोन फूट जाडीचे शेंदूर लेपनाचे कवच काढण्यात आले. मूर्तीवरील हे शेंदूर कवच जवळपास एक हजार ते अकराशे वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज धर्मशास्त्र अभ्यासकांनी यापूर्वी वर्तवला आहे.
शेंदूरचे विसर्जन समुद्र, नदी अथवा अन्य विधीतून करण्यातून भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न तयार झाला होता. पर्यावरणदृष्ट्या प्रश्नचिन्ह तयार होण्याची शक्यता होती. शिवाय हा शेंदूर मिळाल्यावर तांत्रिक-मांत्रिकांकडून विधीसाठी वापर होण्याची आणि व्यावसायिकदृष्ट्या तो खपवला जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
त्यावर उपाय म्हणून शास्त्रीय, पर्यावरणीय, अध्यात्मिक बाबींची पडताळणी करुन विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष वर्धन पी. देसाई, विश्वस्त तथा बांधकाम विभाग प्रमुख भूषणराज तळेकर, ॲड्. ललीत निकम, डॉ. प्रशांत देवरे, मनज्योत पाटील आदींनी शेंदूर स्तंभ उभारण्याता निर्णय घेतला.
गडावर येणारे तीस ते चाळीस टक्यांहून अधिक भाविक फनिक्युलर रोप-वे ने मंदिरात जातात आणि परत येतात. पायऱ्यांवरुन मंदिरात जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांची संख्या यात्रोत्सव वगळता एरव्ही कमी असते.
आता मात्र शेंदूर स्तंभामुळे पायऱ्यांवरुन ये-जा करणाऱ्या भाविकांच्या संख्या वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातून बाजारपेठेतील व्यावसायिकांना दिलासा मिळू शकणार आहे. दरम्यान, विश्वस्त मंडळाने भगवतीच्या मूर्तीवरील शेंदूरचे लेपन विधीवत काढले.
या शेंदूरचा स्तंभ उभारण्याचा निर्णय अध्यात्मिक व ऐतिहासिक आहे, असे सांगून सप्तशृंग गडावरील पुरोहित संघाचे अध्यक्ष विलास दीक्षित म्हणाले, की आदिमायेच्या मूर्ती इतके शेंदूर स्तंभाचे दर्शन भाविक उत्सुक असतील. शेंदूर स्तंभावर स्त्री यंत्राची स्थापना केल्यास अधिक फलदायी असेल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"श्री भगवती मूर्तीसंवर्धन कार्यादरम्यान निघालेल्या शेंदूरचा शास्त्रीय व अध्यात्मिक बाबींचा विचार करुन शेंदूर स्तंभाच्या माध्यमातून संवर्धन करण्याचे कार्य सुरु आहे. यात्रोत्सव व गर्दीच्यावेळी शेंदूर स्तंभामुळे अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. भाविक शेंदूर स्तंभाच्या दर्शनासाठी पहिल्या पायरीवर येणार असल्याने गडावरील अर्थकारणाला अधिक चालना मिळणार आहे."
- भूषणराज तळेकर (विश्वस्त, सप्तशृंग गड निवासिनी देवी ट्रस्ट)
"पहिल्या पायरीजवळ शेंदूर स्तंभ उभारण्याचा विश्वस्त मंडळाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह्य आहे. पहिल्या पायरीजवळील गणपती मंदीराच्या बाजूला हा स्तंभ उभारल्यास योग्य ठरेल, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे."
- अजय दुबे (अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, सप्तशृंग गड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.