Nashik News: ग्राहक न्याय आयोगाचा महावितरणला दणका! शेतकऱ्यास 6 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

Court Order
Court Orderesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : रोहित्र बंद पडल्याने शेतकऱ्याचे झालेल्या नुकसान भरपाईपोटी महावितरणने संबंधित शेतकऱ्याला प्रतिदिन १ हजार २०० रुपये प्रमाणे ६ लाख ८६ हजार ४०० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश नाशिक जिल्हा ग्राहक न्याय आयोगाने दिला आहे.

तसेच जो पर्यंत भरपाई अदा होत नाही तोपर्यंत नऊ टक्के व्याजासह रक्कम देखील देण्यात यावी असेही सांगितले. ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी हा आदेश दिला. (Consumer Justice Commissioner blow to mhavitaran Order to pay compensation of 6 lakhs to farmer Nashik News)

प्रा.कौतिक पवार यांची खायदे (ता. मालेगाव) शिवारात शेती आहे. यात दोन वीजपंप आहेत. जून २०१७ मध्ये वीजपंपांना पुरवठा करणारी डीपी नादुरुस्त झाली. श्री. पवार यांच्या शेतीसाठीच वीजपुरवठा बंद झाला.

त्यांनी कक्ष वायरमन, अभियंता उपविभाग तसेच महावितरणच्या विभाग व सर्कल कार्यालयात तोंडी, लेखी, दूरध्वनीवर तक्रारी केल्या. नियमानुसार ४८ तासात डीपी दुरुस्त न झाल्यास प्रतिदिन १ हजार २०० रुपयांची मागणी केली. या काळात त्यांना सरासरी अवास्तव बिले देत बिल भरण्याचा आग्रही झाला.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Court Order
Nashik News : बंदी उठवल्याने यात्रा-जनावर बाजार पूर्ववत

यानंतर श्री. पवार यांनी जिल्हा ग्राहक पंचायतीकडे दाद मागितली. जिल्हा ग्राहक न्याय आयोगात त्यांच्यातर्फे ॲड. कल्याणी कदम यांनी युक्तिवाद केला. विलास देवळे यांनी श्री. पवार यांना मार्गदर्शन केले.

आयोगाने श्री. पवार व त्यांच्या वकिलांचे म्हणणे मान्य करत सुमारे पाऊण सात लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. हा निकाल ग्राहक हिताचा असून महावितरणने यातून बोध घ्यावा अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली.

Court Order
CM Eknath Shinde Group : ठाकरे गटाला शिंदे गटाकडून सलग दुसरा धक्का!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()