Diwali 2023: आठवडाभरात लाखो रुपयांची उलाढाल; दुकानांपेक्षा रस्त्यावरील खरेदीस ग्राहकांची पसंती

Consumer preference for street shopping over shop nashik news
Consumer preference for street shopping over shop nashik newssakal
Updated on

Diwali 2023: सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील कष्टकऱ्यांच्या खिशात बोनसची रक्कम पडताच खरेदीचा उत्साह अनुभवण्यास मिळाला. मात्र अनेकांनी दुकानांपेक्षा रस्त्यावरील खरेदीला प्राध्यान्य दिले. (Consumer preference for street shopping over shop nashik news)

औद्योगिक वसाहतीतील हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या आस्थापनांनी पन्नास हजारांपासून ते दीड ते दोन लाखांच्या बोनसचे वाटप केले. परंतु बहुसंख्य आस्थापनांत केवळ एक महिन्याचे वेतन बोनस देण्यात आले, त्यामुळे कष्टकऱ्यांनी दुकानातील खरेदीपेक्षा रस्त्यावरील खरेदीला पसंती दिली.

शालिमार, मेन रोड, दहिपूल, रविवार पेठ सगळीकडे हेच चित्र होते. फुलांबरोबरच आकाशकंदील निर्मितून व विक्रीतूनही अनेकांच्या हातात लक्ष्मी आली.

Consumer preference for street shopping over shop nashik news
Diwali 2023: फटाक्यांच्या आवाजांवर निर्बंध; कारवाई कोण करणार यावर संभ्रमावस्था

गेल्या आठ-दहा दिवसांपासून बाजारपेठेत गर्दी आहे.

व्यवसाय ठप्प

अनेक मोठ्या व्यावसायिकांनी खास दीपावलीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. परंतु ग्राहकांनी यंदा मोठ्या दुकानांकडे पाठ फिरवत रस्त्यावरील हातगाडीवर किंवा छोट्या दुकानांत खरेदीस प्राध्यान्य दिल्याने अनेक मोठे व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.

Consumer preference for street shopping over shop nashik news
Diwali 2023 : अंबाबाई मंदिराच्या शिखरावर आज प्रज्वलित झालेला काकडा म्हणजे नक्की काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.