नाशिक : नुकताच सुरू झालेला आषाढ महिना (Ashadh Month), तसेच तुलनेने आषाढ महिन्यात पडणारा पाऊस (Rain) हा जास्त प्रमाणात असतो. यामुळे वातावरणातील आद्रता तसेच थंडावा वाढलेला असतो. तसेच आषाढात पचनास (Digestion) सुलभ अशा पदार्थांचे सेवन केले जाते. पूर्वजांनी रीतिरिवाज हे निसर्ग तसेच आरोग्याला अनुसरून खाद्य परंपरेची सांगड घातली आहे. (Consumption of easy digestible foods in Ashadh Nashik News)
रीतिरिवाज आणि ऋतूनुसार खाद्यपदार्थ बनवून सेवन केले जातात. पचनशक्ती कमी झाल्यामुळे स्निग्धता गरजेची असते. त्यामुळे आषाढात तळणीचे पदार्थ केले जातात. महाराष्ट्रात आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ करण्याची पध्दत आहे. याला आखाड तळणे असेही म्हणतात. यात प्रामुख्याने गोड गुळाच्या पुऱ्या, खीर यांचा समावेश असतो. आषाढ महिन्यात पाऊस जास्त झालेला असतो. त्यामुळे धरणात जलसाठा वाढतो, तसेच ठिकठिकाणचे पाणी वाहत येऊन नदीला मिळत असते. त्यामुळे गढूळ पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे दूषित पाण्यामुळे होणारे आजारांचा धोका जास्त प्रमाणात असतो. साथीचे रोगांचाही धोका असतो. लहान मुलांची आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आरोग्यासाठी आषाढ महिन्यात देवीची पूजा केली जाते. आखाड तळला जाऊन नैवेद्य दाखविला जातो.
विशेषतः मरीमाताची पूजा केली जाते, नैवेद्य दाखविला जातो. साथीचे रोगांपासून तसेच सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. तसेच आबादानी पावसामुळे शेती समृद्ध होत असते, यासाठी प्रार्थना केली जाते. सर्दी, खोकला यापासून संरक्षण व्हावे म्हणून आलेपाक वडीचे सेवन केले जाते.
आषाढ महिन्यातील खाद्यपदार्थ
गुळाच्या गोड पुऱ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या, कापण्या, राजगिरा लाडू, थालीपीठ, तसेच मुगाची डाळीची खिचडी, मुगाचे भजी, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू, खीर, भाजणी पीठाचे थालीपीठ, आलेपाक वडी आदी पदार्थांचे सेवन लाभदायी ठरते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.